सोलापूर : प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या १४, १५ आणि १६ ऑक्टोबर २०२२ रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे “प्रिसिजन गप्पा’ आयोजित करण्यात आला आहे. सोलापूरकरांना दिवाळी आधी गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे. Precision chat from October 14 in Solapur; Major attraction of comedians including actor Makarand Anaspuren
सलग दोन वर्षांच्या ऑनलाईन गप्पांच्या वेगळ्या अनुभवानंतर यावर्षी प्रत्यक्ष गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा व प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतिन शहा हे उपस्थित होते.
कोरोनाच्या निर्बंधासारख्या श्वास कोंडणाऱ्या वातावरणातून बाहेर पडून जगणं पुन्हा रंगतदार होतंय. सण – उत्सवांना पुन्हा उधाण आलं. अशा उत्सवी आणि मुक्त वातावरणात अधिक भर घालण्यासाठी यावर्षीच्या प्रिसिजन गप्पा घेऊन येत आहोत, अशी माहिती या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
यावेळी लातूर येथील जनाधार सेवाभावी संस्था सामाजिक संस्था आणि मंगळूर येथील वात्सल्य सामाजिक संस्था यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम होणार आहे. प्रिसिजन गप्पांचं हे १४ वे वर्ष आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदन सोहळा पार पडेल. या वर्षांचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हा लातूर येथील जन-आधार सेवाभावी संस्थेच्या संजय कांबळे यांना देण्यात येणार आहे, तर स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार हा वात्सल्य सामाजिक संस्था, (मंगरुळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) संस्थेच्या उमाकांत मिटकर यांना देण्यात येणार आहे. मकरंद अनासपुरे यांची चित्रपट ते सामाजिक प्रवास घडवणारी. नाम मात्र मकरंद, या दिलखुलास मुलाखतीचा कार्यक्रम होईल.
शनिवार दि. १५ ऑक्टो. रोजी ‘कोकण कन्या ब्रँड’ हा कार्यक्रम सादर होईल. १६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतून हास्याचे कारंजे उडवणारे, हास्यवीर आपल्या भेटीला येतायत. तीनही दिवस सायंकाळी ६.२५ वा. गप्पांना प्रारंभ होईल. शिवछत्रपती रंगभवनच्या प्रांगणातही आसनव्यवस्था व एलईडी प्रोजेक्टरद्वारे कार्यक्रम पाहण्याची सोय असेल. रसिक सोलापूरकरांनी मप्रिसिजन गप्पांचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुहासिनी व यतिन शहा यांनी केले.