मुंबई : WhatsApp आज गेल्या दीड तासांपासून डाऊन आहे. त्यातच आज सूर्यग्रहणही आहे. त्यामुळे WhatsApp आणि सूर्यग्रहण यांचा संबंध जोडत अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. WhatsApp ला ग्रहण लागलं, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान WhatsApp लवकरच सुरु होईल, काम सुरु आहे, अशी माहिती मेटा कंपनीने दिली आहे. लोकांना मेसेज पाठवण्यास अडचणी येत होते. With the solar eclipse, the eclipse of WhatsApp is finally over, a relief to millions of people
यंदाच्या दिवाळीमध्ये सूर्यग्रहण आहे. 1995 नंतर आता 2022 मध्ये दिवाळीला हे सूर्यग्रहण असणार आहे. . देशातील जवळपास सर्वच राज्यांशिवाय इतर अनेक देशांमध्येही हे सूर्यग्रहण दिसणार आहे. मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:22 पासून सूर्यग्रहण सुरू होईल व संध्याकाळी 6.25 पर्यंत राहील. या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमास बंदी असेल. त्यामुळे दिवाळी वाढून 5 ऐवजी 6 दिवसांवर आली आहे. यातच व्हाट्सअपलाही ग्रहण लागले पण ते काही तासात सुटले.
WhatsApp सेवा आज बंद झाली आहे. गेल्या 1 तासापासून WhatsApp वरून मेसेज सेंड करता येत नाही. जगभरात WhatsApp ची सेवा ठप्प पडली आहे. सर्व्हर डाऊन झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान हा मोठा सायबर अटॅक असण्याची शक्यता सायबर तज्ञांनी व्यक्त केली आहे. जर हा मोठा सायबर अटॅक असेल तर आज दिवसभर WhatsApp बंद राहू शकते, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सुमारे दोन तासांपासून बंद असलेले व्हॉट्सअप अखेर सुरु झाले आहे. व्हॉट्सअप डाऊन झाल्याचा फटका कोट्यावधी युजर्सना बसला होता. यानंतर कंपनीने तात्काळ बिघाड दुरुस्त करत व्हॉट्सअप सुरु केले आहे. व्हॉट्सअप सुरु झाल्याने युजर्सला मोठा दिलासा मिळाला आहे.
जगभरात WhatsApp सेवा ठप्प झाली आहे. सर्व्हर डाऊन झाले आहे. लोकांना मेसेज पाठवता येत नाही. त्यामुळे ट्विटरवर तक्रारींचा पाऊस पडला आहे. हा सायबर अटॅक असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान WhatsAppने याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. युजर्सला त्रास होत आहे, लवकरात लवकर WhatsApp सुरु करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती मेटा कंपनीने दिली आहे. WhatsAppची अधिकृत मालकी या कंपनीकडे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सेवा पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे एका निवेदनात म्हटले होते. त्यानुसार सुरूही झाले.
दुपारी 12.30 वाजण्याच्या आसपास व्हॉटस अॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. सुरुवातीला इंटरनेटची समस्या असू शकते असे अनेकांना वाटत होते. मात्र, इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्सअॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. काही वेळेत ट्वीटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाला. व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
Downdetector ने दिलेल्या माहितीनुसार, 69 टक्के युजर्सना मेसेज करण्यात अडचणींना सामोरे जावे लागले. तर, 21 टक्के युजर्सकडून इंटरनेट कनेक्शनबाबत समस्या जाणवत होती. तर, 9 टक्के युजर्सना इतर समस्या जाणवत होत्या. सुरुवातीला, व्हॉट्सअॅपमधील ग्रुपमध्ये मेसेजचे आदान-प्रदान करण्यात युजर्सना अडचणी जाणवत होत्या. त्यानंतर वैयक्तिक मेसेजही पाठवण्यास अडचणी येऊ लागल्या.
अनेकजण मेसेजिंग, महत्त्वाच्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने कोट्यवधी युजर्सना त्याचा फटका बसला आहे.
मागील वर्षी देखील फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने WhatsApp ची सेवा ठप्प पडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा WhatsApp डाऊन झाले आहे. ट्वीटरवर युजर्सकडून याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. WhatsApp चा सर्व्हर क्रॅश झाल्याने सेवा खंडीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे. युजर्सकडून इतर मेसेजिंग अॅपचा वापर करण्यात येत आहे.
#WhatsAppDown च्या ट्रेंडसह युजर्सकडून मिम्सचा वर्षाव सुरू आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर युजर्सकडून मिम्स व्हायरल करण्यात येत आहेत. अनेकांकडून टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या मेसेजिंग अॅपचा वापर करण्याचा आग्रह धरला आहे. व्हॉट्सअॅपने काही महिन्यांपूर्वी आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला होता. त्यातील प्रीव्हेसीच्या मुद्यांवरून युजर्सकडून व्हॉटसअॅपला विरोध करण्यात आला होता. त्यावेळी सिग्नल आणि टेलिग्रामच्या वापराचा आग्रह धरण्यात येत होता.
जगभरात व्हॉट्सअॅपचे दोन अब्जहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप ही जगभरात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. दररोज 100 अब्जाहून अधिक मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवले जातात. Android मोबाइलवर युजर्स प्रतिदिवस सरासरी 38 मिनिटे WhatsApp चा वापर करतात. भारतात सर्वाधिक WhatsApp चे युजर्स आहेत. भारतात 390.1 दशलक्ष युजर्स आहेत.
व्हॉट्सअॅप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. व्यावसाय, नोकरीतही व्हॉट्सअॅपचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. अनेकजण मेसेजिंग, महत्त्वाच्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने कोट्यवधी युजर्सना त्याचा फटका बसला आहे.