सोलापूर : शहरातील एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याबद्दल तिचे वडिल,पती व सासरे यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Marriage of a minor girl; Twelve weeks pregnant with a baby girl; Crime against girl’s father along with husband, father-in-law
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन निर्भया हिचे लग्न मे २२ मध्ये झाले. तसेच त्याच लग्नात निर्भयाच्या मोठ्या बहिणीचे लग्न तिच्या नवऱ्याच्या भावाबरोबर झाले होते. लग्न झाल्यानंतर निर्भया ही सासरी नांदण्यास आल्यानंतर तिचे पती बरोबर शरीर संबंध झाले. त्यानंतर पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात ऍडमिट केले असता ती १२ आठवड्याची गरोदर असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी डॉक्टरांनी त्या मुलीचे आधार कार्ड मागितले असता ते वेळेत दिले नाही. संशय आल्यानंतर हॉस्पिटलने वारंवार मागणी केली. त्यानंतर ती मुलगी १७ वर्ष ७ महिने वयाचे असल्याचे निदर्शनास आले. मुलगी अल्पवयीन असताना सुद्धा तिचे लग्न लावून दिल्याबद्दल त्या निर्भयाच्या वडिलावर, सासऱ्यावर तसेच मुलगी अल्पवयीन असताना देखील तिच्याबरोबर शरीर संबंध ठेवल्याबद्दल पतीविरोधात बाल लैंगिक कायद्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे यांनी फिर्याद दाखल केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
● कोंडी येथील अपघातातील दुचाकीस्वाराचा मृत्यू
सोलापूर – कोंडी शिवारात अपघात होऊन जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान आज रविवारी सकाळी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला .
विलास रेवणसिद्ध ऐवळे (वय ४५ रा. देशमुख वस्ती , उत्तर सोलापूर ) असे मयताचे नाव असून ते शनिवारी रात्री आपल्या मोटर सायकल वरून राहुरी कडून घरा कडे येत होते. कोंडी येथील ब्रह्मदेव माने बँकेसमोर गाडी स्लीप होऊन डिव्हायडरला आदळली. यात मार लागून गंभीर जखमी झाले हाते. शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)