मोहोळ : मोदीजी अदानी अंबानी यांच भल करणारे अच्छे दिन आम्हाला नको आहेत, तुम्ही पंतप्रधान होण्यापूर्वी जे बुरे दिन होते तेच हवे आहेत असे म्हणत वाढती महागाई बेरोजगारी यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रहार केला. Mohol: Sushma Andahar attacked inflation and unemployment, Shinde Bhau will also play Devendra Bhau’s Mahaprabodhan Yatra
मोहोळ येथे शिवसेना ( ठाकरे ) यांच्या वतीने मोहोळ नगर परिषदेसमोर महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळेस शिवसेना उपनेत्या व सोलापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख संजना घाडी, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक आणि मोहोळच्या माजी नगरसेविका सीमा पाटील, सोलापूर लोकसभा समन्वयक दीपक गायकवाड, शिवसेना तालुका समन्वयक काकासाहेब देशमुख, पं.स माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार, शिवसेना उत्तर सोलापूर उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे, शिवसेना मोहोळ तालुका प्रमुख अशोक भोसले, शिवसेना बार्शी तालुका प्रमुख प्रवीण काकडे, शिवसेना उत्तर सोलापूर तालुका प्रमुख संजय पौळ, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक शरद कोळी, युवासेना जिल्हा प्रमुख महेश देशमुख शिवसेना मोहोळ शहर प्रमुख विकी देशमुख, युवती सेना जिल्हा प्रमुख आयोध्या पोळ, प्रा. अजय दासरी, बाळासाहेब वाघमोडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मशाल प्रज्वलित करून करण्यात आली. संजना घाडी अनिल कोकीळ, दीपक गायकवाड, दादासाहेब पवार महेश देशमुख, विक्रम देशमुख, काका देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख म्हणून सर्व जबाबदाऱ्या अत्यंत काळजीने पार पाडल्या, स्वतः मुख्यमंत्री असताना नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांना दिले असे असताना उद्धव ठाकरे भेटत नाहीत. त्यांच्याकडून निधी मिळाला नाही. राष्ट्रवादी बरोबर गेल्याने शिवसेना संपत आहे, असे खोटे आरोप करून या ४० लोकांनी गद्दारी केली, असे सांगत जे लोक भाजपा वर विश्वास ठेवून गेलेत, त्या शिंदे भाऊचा सुद्धा देवेंद्र भाऊ गेम करणार असल्याचे ठणकावून सांगितले.
हे 40 लोक केवळ सत्तेच्या लालचेपोटी आणि केंद्रातील ईडी, सीबीआय सारख्या संस्थांच्या कारवाईला घाबरून गेले आहेत. हे चाळीस गेले म्हणून शिवसेना संपत नसते. खरा शिवसैनिक हा आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी असल्याचे सुषमा अंधारे सांगितले.
या स्टेजवर असणाऱ्या प्रमुख मान्यवरांची नावे घेत असताना देशमुख देशमुख अशी यादीत नावे जास्त दिसल्याने ते देशमुख ॲड सन्स कंपनीच दिसतेय असे सुषमा अंधारे म्हणाल्या अन श्रोत्यात हशा पिकला.
शिवसेना युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी हे मोहोळ तालुक्यातील असल्याने व परखड बोलल्याने बाहेर त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. परंतु मोहोळमध्ये काहीच न बोलल्याने कार्यक्रमानंतर त्यांना का बोलू दिले नाही याचीच चर्चा रंगली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 जो पक्ष तिकीट देईल त्यांच्याकडे जाणार, पण लढणार शहर उत्तरमधूनच : महेश कोठे
सोलापूर : मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला, असे कधीही म्हटले नाही. पण, आमदार व्हायचे ठरवले आहे. त्यामुळे विधानसभेची आगामी निवडणूक मी शहर उत्तर मतदारसंघामधून लढणार आहे. जो पक्ष आमदारकीचे तिकीट देईल; त्या पक्षात राहण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, अशी भूमिका माजी महापौर महेश कोठे यांनी जाहीर केली.
गेल्या दोन दिवसांपासून महेश कोठे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत म्हणजेच एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना कोठे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. कोठे म्हणाले की, माझी मागणी आमदारकीची आहे. पण, महेश कोठे आमदार कसे होणार नाहीत, यासाठी सगळ्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केले आहेत. पण यंदा आमदारकी घ्यायचीच, असे आम्ही ठरवले आहे.
आमदार काय काम करू शकतो, हे सोलापूरला दाखवायचे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ध्येयापासून जराही विचलित होणार नाही. ते म्हणाले की, एका कार्यक्रमात मी सोलापूरच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्याशी बोललो होतो.
महेश कोठे हे शिंदे गटात प्रवेश करत असतील तर निधी दिला जाईल, असे त्यांनी मला सूचित केले होते. मात्र, मी राष्ट्रवादी सोडली, असे कधीही म्हटलेले नाही. काही लोक माझ्याविरोधात कायम बोलत असतात. मात्र त्यांच्याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही. मला मुख्यमंत्री शिंदे यांनीही भेटायला बोलावले होते. पण, मी त्यांना सांगितले की, मी यापुढची निवडणूक शहर उत्तरमधून लढवणार आहे. त्यामुळे जी पार्टी मला शहर उत्तरमधून तिकीट देईल, त्या पार्टीत राहण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही महेश कोठे यांनी स्पष्ट केले.
● ज्यांना मी नको त्यांनी पवारांकडे तक्रार करावी
ज्यांना मी राष्ट्रवादीत नको आहे, त्यांनी माझी तक्रार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे करावी. पवार यांना वाटले की माझ्यापेक्षा ते सक्षम आहेत, तर ते त्यांच्याकडे नेतृत्व देतील. त्यामुळे हा विषय आपल्या अखत्यारीतील नसल्यामुळे त्यांनी आपली कुवत बघून वागावे. कोणाला नेतृत्व द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही, हे पवार यांना माहिती आहे, त्यामुळे पवार यांनी पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सांगितले तरी ते मी करायला तयार आहे, असेही कोठे यांनी स्पष्ट केले.