सोलापूर / पंढरपूर : पंढरपूर शहरातील सर्वात जुनी व आर्थिक दृष्ट्या महत्वाची असणारी 110 वर्षे पूर्ण केलेली पंढरपूर अर्बन को. ऑप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज विरोधी धोत्रे पॅनलचे सर्व अर्ज नामंजूर झाल्याने बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. Pandharpur Urban Bank quinquennium election unopposed; All applications of anti-Dhotre panel rejected
विरोधकाचे अर्ज नामंजूर झाल्याने बँकेची निवडणूक परिचारक गटाच्या ताब्यात आली आहे. आज अर्ज छाननीच्या दिवशी माजी आमदार व बँकेचे विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या पॅनलचे 17 जागांसाठी भरलेले 18 अर्ज वैध ठरले व विरोधकांचे सर्व अर्ज अवैध ठरले त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. पंढरपूर अर्बन को. ऑप. बँकेच्या छाननीत दिलीप – धोत्रे यांनी बनविलेल्या पॅनलच्या सर्व १७ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत.
आजवर पंढरपूर अर्बन बँकेसाठी विरोधी गटाकडून पूर्ण पॅनल कधीही उभा राहिले नाही. बँकेच्या पंढरपूर शहरासह, मंगळवेढा, सांगोला मोहोळ,सोलापूर, बारामती, पुणे या ठिकाणासह एकूण 19 शाखा आहेत. बँकेचे 33 हजार 706 सभासद आहेत.
अर्बन बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलनं दबाव तंत्राचा वापर केलायं, चुकीच्या पध्दतीनं नियमांचा अर्थ लावून आमच्या अर्जावर आक्षेप घेतले आणि रडीचा डाव खेळला अशी प्रतिक्रिया दिलीप धोत्रे यांनी दिली असून या विरोधात आपण सोलापूर आणि उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पंढरपूर अर्बन बँकेवर गेली अनेक वर्ष प्रशांत परिचारक गटाचं वर्चस्व आहे. या बँकेच्या नुकत्याच निवडणुका जाहीर झाल्या. यात सत्ताधारी परिचारक पॅनल विरोधात दिलीप धोत्रे यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणून आघाडी पॅनल स्थापन केलं होतं. १७ जागांसाठी ही निवडणूक लागली होती. दोन्ही गटांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर काल छाननी झाली आणि आज सकाळी छाननीचा निकाल स्पष्ट करण्यात आला.
दिलीप धोत्रे पॅनलच्या सर्व सदस्यांच्या अर्जावर परिचारक गटाकडून घेण्यात आलेले आक्षेप बँकेची नियमावली पाहता नामंजूर करण्यात येत असल्याच उपनिबंधकांनी जाहीर केलं. आता या निवडणुकीत १७ जागांसाठी परिचारक पॅनलच्याच १८ जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. माघार घेण्याच्या मुदतीत हा जादा अर्ज मागे घेतला जाईल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल असं परिचारक गटाचं म्हणणं आहे.
दिलीप धोत्रे गटानं मात्र उपनिबंधकांच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाईची घोषणा केली आहे. मात्र पहिल्या डावपेचात धोत्रे गटाला परिचारक गटानं चंद्रभागा काठ दाखविला, अशी चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सत्ताधारी गटाने यंदा अनिल अभंगराव व ऋषिकेश उत्पात, व्यंकटेश कौलवार,गजेंद्र माने, अनंत कटप, गणेश शिंगण, अमित मांगले व डॉ. संगीता पाटील या आठ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. परिचारक गटाकडून अनेकांनी उमेदवाराची इच्छा व्यक्त केली होती. आज बुधवार २८ रोजी अर्जाची छाननी झाली त्यामध्ये मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखालील समचारी आघाडीच्या माध्यमातून उमेदवाराचे अर्ज छाननी मध्ये बाद झाले आहेत.
पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडीने स्थापन केली होती. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी विविध पक्ष व संघटनांना एकत्र करून पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडीने स्थापन केली होती. या आघाडीकडून माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, महादेव भालेराव, दिनेश गिड्डे, श्रीकांत शिंदे, मंदार बडवे, महेश उत्पात, हरिदास शिरगिरे, अशोक बंदपट्टे, एकनाथ सुर्वे, हनुमंत बाबर, बजरंग थिटे, रमेश थिटे, राजकुमार जाधव, मधुकर चव्हाण, छाया खंडागळे, रत्नमाला पुणेकर व जनाबाई अवघडे यांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र आजच्या छाननी मध्ये हे सर्व अर्ज अवैध ठरले आहेत.