● भाजप केवळ राजकारण करत असल्याचा आरोप
सोलापूर : कौटुंबिक मतभेदातून विमानतळाचा मुद्दा राजकारण करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून होत आहे. यामध्ये २७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह असणारा हा सिद्धेश्वर साखर कारखाना बंद व्हावा ही भावना दिसते. कारखानाही राहिला पाहिजे आणि विमानतळही व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. बोरामणी विमानतळ हा दुसरा हा दुसरा पर्याय सोलारपूरकरांच्या दृष्टीने हिताचा ठरू शकतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. MPs not positive on solving Solapur air service issue – MLA Rohit Pawar BJP Politics
रविवारी (ता.1) आमदार पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी श्री सिध्देश्वर देवस्थानने होम मैदानावर भरविलेल्या राज्यस्तरीय कृषी पंचकमिटीचे अध्यक्ष प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर श्री सिध्देश्वर देवस्थान धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी तेथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नगरमध्ये माळढोक पक्ष्यांसाठी सर्वाधिक क्षेत्र आरक्षित असतानाही तेथे विमानसेवा सुरु व्हावी म्हणून वनविभागाच्या जागेचा तिढा आम्ही सर्वांनी मिळून सोडविला. याच धर्तीवर सोलापुरातील लोकप्रतिनिधींनी केंद्रात नेटाने प्रयत्न केल्यास बोरामणी विमानतळाचा प्रश्नही निश्चितच मार्गी लागेल, असा विश्वास कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बोरामणी विमानतळासंबंधी असलेले प्रश्न विद्यमान खासदारांनी पाठपुरावा करुन सोडवला पाहिजेत, मात्र यात त्यांची सकारात्मकता यातून दिसत नाही. विमानतळासाठी फॉरेस्टच्या जागेची आडकाठी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र माझ्याही मतदारसंघात असा प्रश्न होता मात्र तो आम्ही कौशल्याने सोडवला. यामध्ये इच्छाशक्ती असायला हवी, अशीही अपेक्षा व्यक्त करताना रोहित पवारांनी सध्या जे राजकारण चालले आहे ते व्यक्तीकेंद्रित आहे. हा सोलापूरकरांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोपही पवार यांनी केला.
सोलापुरात भाजप लोकप्रतिनिधींची संख्या अधिक असतानाही बोरामणी विमानतळासाठी अडसर ठरलेल्या वनविभागाच्या जमिनीचा तिढा का सुटत नाही, असा सवाल करीत भाजप याप्रकरणी केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला.
कुमठे येथील श्री सिध्देश्वर साखर कारखान्याला चिमणीशिवाय पर्याय नाही, पण विमानसेवेला पर्याय असतानाही चिमणी पाडण्याचा हट्ट का, यामागे नेमके राजकारण कोण करत आहे याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. काडादी हे शेतकरी, कामगारांसाठी काम करीत आहेत. काडादी घराण्याचे शैक्षणिक. सामाजिक, धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे.
जिल्ह्यातील ३० हजार शेतकरी सभासद असलेल्या श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे योगदान राहिले आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे कल्याणच केले आहे. या साखर कारखान्यावर शहरातील काही उद्योग अवलंबून आहेत. या सर्वांच्या हितासाठी आम्ही कारखाना व शेतकऱ्यांच्या बाजूंनी निश्चितपणे उभे राहू, असेही त्यांनी सांगितले. विमानसेवेला पर्याय असतानाही काही मंडळी स्वतःच्या खासगी कारखान्यासाठी आणि काहीजण जुना वाद चिमणीच्या आडून खेळत असल्याचेही आमदार पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संतोष पवार, श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, शरणराज काडादी, माजी नगरसेवक किसन जाधव, तौफिक शेख, सिध्दाराम चाकोते, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, रोप फाउंडेशनचे नजीब शेख, आनंद मुस्तारे, अजमल शेख, अयाज दिना आदी उपस्थित होते.