□ सोलापूरने साखर उत्पादनात १ लाख कोटी क्विंटलचा ओलांडला टप्पा
सोलापूर : यंदाच्या गळीत हंगामात सोलापूर जिल्हा ऊस गाळप आणि साखर उत्पादनात राज्यात आघाडीवर असून कोल्हापूर जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे तर सोलापूर जिल्ह्याने साखर उत्पादनाचा १ कोटी क्विंटल चा टप्पा ओलांडला असला तरी साखर उताऱ्यात मात्र अत्यंत पिछाडीवर आहे. साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. In Solapur, farmers are lagging behind in sugar production and leading in silage, Kolhapur
चालू गळीत हंगामात राज्यात १०१ सहकारी व ९७ खाजगी अश्या एकूण १९८ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे.९ जानेवारी पर्यंत सोलापूर विभागातील ४७ कारखान्यांनी १४४.१६ लाख टन ऊसाचे गाळप करून १२३.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित केली असून साखर उतारा सरासरी ८.५६ टक्के इतका कमी आहे. तर कोल्हापूर विभागातील ३४ कारखान्यांनी १४४.१६ लाख टन ऊसाचे गाळप करून १२३.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन करीत सरासरी साखर उतारा १०.९५ टक्के आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्हा साखर उताऱ्यात अव्वल स्थानी आहे.
(९ जानेवारी पर्यंत विभागावार गाळप स्थिती. तक्ता पहा)
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यातील १९८ कारखान्यांनी ५७९.७० लाख क्विंटल ऊसाचे गाळप करून ५६०.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४९ टक्के इतका आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात २० लाख टनांनी ऊस गाळप जादा झाले असून साखर उताऱ्यात मात्र काहींशी घट झाली आहे. गतवर्षी याच दरम्यान ९.८२ टक्के इतका साखर उतारा होता.त्यातुलनेत यंदा साखर उतारा कमी झाला आहे.
□ यामुळे उताऱ्यात पिछाडीवर राहिला
जिल्ह्यात सर्वाधिक ऊस गाळप झाले असले तरी, मात्र साखर उताऱ्यात पिछाडीवर का राहिला आहे. ? याचाही विचार झाला पाहिजे. ऊस उत्पादक पूर्ण वाढलेला ऊस गळीतास पाठवितात आणि शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन ब्रिक्स मशीनद्वारे साखर उतारा चेक केला असता १० टक्केच्या पुढेच उतारा मिळतो. मग कारखान्यांमध्ये मिळणाऱ्या आणि प्रत्यक्ष शेतात मिळणाऱ्या साखर उताऱ्यातील तफावतीकडे आयुक्त कार्यालयाने लक्ष दिले पाहिजे.
कोल्हापूर जिल्ह्यात १० टक्के पेक्षा जास्तीचा उतारा आणि सोलापूरमध्ये साडे आठ टक्के कमी दाखवला जात असल्याची गंभीर बाब आहे. या सरासरी साखर उताऱ्याचा पुढील वर्षीच्या एफआरपीवर (FRP) मोठा परिणाम होणार आहे. या घसरलेल्या टक्केवारीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारणावर ही कोलमडणार आहे.
– बालाजी चव्हाण
(उस उत्पादक शेतकरी, माढा)