□ माळशिरस तालुक्यातील दसूर च्या शेतकऱ्याकडे गव्हावर प्रयोग
□ उत्तर भारतीयांची मक्तेदारी मोडीत, जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात करतील
सोलापूर – सोलापुरी चादरी आणि कडक भाकरीसाठी राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात ज्वारीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. Scientist who lost loved ones to cancer discovers organic fertilizer Malshiras Research Alchemy पण, सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात मोठया प्रमाणावर करतील, असं तुम्हाला सांगितलं तर… तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे शक्य आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील दसूर येथील शेतकरी सुभाष कागदे यांच्या शेतात याबाबतचा प्रयोग देखील सुरू आहे.गुजरातमधल्या सुरतचे डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी त्यांच्या प्रदीर्घ संशोधनातून ‘जैनम चरखा’ आणि ‘क्रांती’ या सेंद्रीय खताची निर्मिती केली आहे. सेंद्रीय शेतीचा पर्याय अवलंबला तर येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देखील आपल्या गव्हाची निर्यात देशभर करू शकतात. गव्हाच्या निर्यातीमध्ये उत्तर भारतामधील राज्यांची मक्तेदारी आहे. बाहेरच्या देशामध्येही याला मोठी मागणी आहे. उत्पादन वाढीच्या शर्यतीमध्ये हे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करून जमीनीचा कस आणि आरोग्यास धोका निर्माण झाले आहेत.
■ संशोधनाची किमया
माळशिरस तालुक्यातील दसूर या गावातील शेतकरी सुभाष कागदे यांनी या सेंद्रिय खताची चाचणी घेण्यासाठी त्यांच्या शेतात दोन भाग केले. त्यापैकी एक एकरमध्ये त्यांनी रासायनिक खत टाकून गहू लावला. त्याला अद्याप लोंब्या आल्या नाही आणि वाढही झाली नाही तर चार एकर मध्ये ‘जैनम चरखा’ आणि ‘क्रांती’ या खताचा वापर केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एकाच दिवशी लावलेल्या या दोन्ही पिकांपैकी सेंद्रीय खत वापरलेला गहू या पिकाला आता मोठ्या लोंब्या पाहायला मिळत आहेत. रासायनिक प्रकारे पिकवलेल्या गव्हामध्ये अजूनही हा बदल झालेला नाही. डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी मोठ्या संशोधनानंतर जैनम चरखा आणि क्रांती हे प्रॉडक्ट बनवलंय.
अनेक वर्षांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी बनवलेलं हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरत आहे. सरकारनं याकडं विशेष लक्ष देऊन सबसिडी जाहीर करावी, अशी मागणी जैनम चरखाचे संचालक अनिल जैन यांनी केली.
कर्करोग मुक्त भारत करणे हा मुलभूत संकल्प करून डॉ. ए.एस चन्नीवाला यांनी अनेक वर्षाच्या अथक संशोधनातून सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी रसायन मुक्त शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ते कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. हे खत पिकास वापरल्या नंतर शेतकऱ्यांना युरिया, डि ए.पी पाण्यात विरघळणारे एन पी के,सुक्ष्म अन्नद्रव्ये,सल्फेट खते किंवा कोणतेही रासायनिक खत वापरण्याची गरज पडत नाही.
आपले पिक चांगल्या किमतीत विकायचे असेल किंवा रोगमुक्त राहायचे असेल तर हे खत योग्य आहे.मी चार एकर मध्ये हे खत वापरले आहे. फरक दिसून आला आहे.लवकरच गहू तयार होवून खाण्यासाठी वापर करणार असल्याचे सुभाष कागदे
(शेतकरी ,दसूर ता. माळशिरस) यांनी सांगितले.