सोलापूर : जडवाहतुकीने सोलापुरात चार दिवसात दुस-या चिमुकल्याचा बळी घेतला आहे. शहरातील अशोक चौक परिसरात आज शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास जड वाहतुकीच्या अपघातात एका तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Solapur | Second incident in four days; Toddler victim in heavy traffic Ashok Chowk
भरधाव वेगात निघालेल्या मालट्रकच्या चाकाखाली चिरडून या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. असद अल्ताफ बागवान (वय ३, रा. कर्जाळ, ता. अक्कलकोट) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस दलाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत मुलाचे शव शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
अशोक चौक परिसरात दुचाकी ( एमएच १३ बीएस ८३७७) स मालट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत गाडीवरील मुलगा खाली पडला अन् मालट्रकच्या चाकाखाली सापडला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील अन्य दोघेजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
मागील महिन्याभरापासून शहरात जडवाहतुकीने बळी गेलेल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे जड वाहतूक करणारे मालट्रक बिनधास्त शहरात येतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचेही सांगण्यात आले. बाह्य रस्त्यावरून जडवाहतूक करता येऊ शकते, पण इंधन वाचवण्याकरिता ही जलवाहतूक बिनदिक्कतपणे शहरातून होत आहे.
जड वाहतूक अपघातात आतापर्यंत अनेक लहान मुलांचा जीव गेला आहे. शहरातील जड वाहतूकीला अनेक संघटना, संस्थांसह लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे पण त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने सोलापूरकरांनी संताप व्यक्त केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू, चार महिन्यात चौथा बळी; डंपर किती बळी घेणार ?
सोलापूर : शहरात रविवारी (ता.२२ ) सायंकाळी पाचच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. जुना पुना नाका छत्रपती संभाजी महाराज पुतळाजवळ अवजड डंपर खाली चिरडून एका १० वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना इतकी भयानक होती की,पाहणाऱ्यांचे काळीज हेलावून गेले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीपाद पवन कवडे (वय-१०) हा आपल्या आई, मुलगा व बहिणीसह शिवाजीनगर बाळे येथील पाहुण्यांच्या घरून शिंदे चौकातील आपल्या घरी एम.एच.१३.सी.व्ही.७९५६ या दुचाकीवरून परतत असताना पाठीमागून आलेल्या एम.एच.१३ सी.यु.४९८७ या डंपरने धडक दिली.
यात श्रीपाद पवन कवडे (वय-१०,रा.शिंदे चौक सोलापूर) याचा डंपरच्या पाठीमागील चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळतात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करत चालकाला चोप दिला.
नागरिकांच्या गर्दीतून डंपर काढून पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले तर मुलांचा मृतदेह सोलापूर शहारातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिंदे चौकातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली.