सोलापूर : एनटीपीसी मध्ये मोठ्या पदावर नोकरी लावतो म्हणून चौघांकडून रक्कम घेऊन एकूण २५ लाख ५ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Lure of job in NTPC is expensive; Ganda Solapur fraud of twenty five lakhs to four
ही घटना जून २०२० ते १३ जुलै २०२१ रोजीपर्यंत घडली. याप्रकरणी अल्तमश सिराजअहमद हिरापुरे (वय-३२,रा. संजीव नगर लक्ष्मीनारायण टॉकीजच्या पाठीमागे सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुरज रमेश चव्हाण (रा.चित्तुर चनम्मा नगर,विजापूर रोड सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वृत्तपत्रांमधील जाहिरात पाहून फिर्यादी यांनी ७०२०२१२४५६ या क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी वरील संशयित आरोपी याने मी एनटीपीसी मध्ये मोठ्या पदावर नोकरीस आहे. माझे मोठ्या लोकांमध्ये उठणे-बसणे आहे. मी बऱ्याच मुलांना सरकारी व मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला लावले आहे, असे फिर्यादी यांना सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांनी वरील संशयित आरोपी सुरत चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीस एनटीपीसी मध्ये इलेक्ट्रिक इंजिनियर या पदाकरिता नोकरीला लावतो म्हणून ५ लाख ९० हजार रुपये,अजहर मो.आजम शहापुरे, (रा.सिद्धेश्वर पेठ सोलापूर) यांना ज्युनिअर इलेक्ट्रिक इंजिनिअर या पदावर नोकरीच लावतो म्हणून ६ लाख १० हजार रुपये, इमरान दाऊद पिरजादे (रा.सिद्धेश्वर पेठ) यांना शिक्षण व डिप्लोमाच्या अनुषंगाने नोकरीला लावतो म्हणून ६ लाख ५५ हजार रुपये तसेच मकबुन दुधनशाह शेख (रा. सिद्धेश्वर नगर मजरेवाडी यांच्याकडून ५ लाख ९० हजार रुपये असे एकूण २५ लाख ५ हजार रुपये चौघांकडून घेऊन नोकरीस न लावता फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● पैशाच्या कारणावरून बहिणीचा खून; सख्खी बहीण आणि तिच्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा
सोलापूर – आर्थिक व्यवहार आणि अनैतिक संबंधाच्या कारणावरून सख्या बहिणीचा चाकूने खून केल्याच्या आरोपावरून मयताची सख्खी बहिण आणि तिची विवाहित मुलगी या दोघांना जन्मठेप अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.एच.पाटवदकर यांनी बुधवारी ठोठावली.
साखराबाई शिवाजी मल्लाव (वय ५०) आणि तिची विवाहीत मुलगी अनिता विजय भुई (वय ३५ दोघी रा. तिरहे_ ता.उत्तर सोलापूर) अशी शिक्षा झालेल्या मायलेकींची नावे आहेत.या दोघींनी मिळून हौसाबाई मल्लाव (वय ५५) यांचा खून केला होता.
या खटल्याची हकीकत अशी हौसाबाई मल्लाव या ति-हे येथे आपल्या मुलासोबत राहण्यास होत्या. कांही अंतरावर त्यांची बहीण साखराबाई मल्लाव आणि तिची मुलगी अनिता भुई या दोघी राहण्यास होत्या. बहिणीचे अनैतिक संबंध आणि पैशाच्या देण्याघेण्यावरून सख्या बहिणीत वाद होता.
घटनेच्या दिवशी म्हणजेच १२ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास हौसाबाई मल्लाव या घरात काम करीत होत्या. त्यावेळी साखराबाई मल्लाव आणि तिची मुलगी अनिता या दोघी त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. त्यानंतर साखरबाई हिने त्यांच्यावर चाकूने हल्ला केली होती.या मारहाणीत हौसाबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्या उत्तरादरम्यान मयत झाल्या.
दरम्यान त्यांनी दिलेल्या मृत्यूपूर्व जवाबावरून सोलापूर तालुक्याच्या पोलिसांनी मायलेकी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली होती.
या खटल्यात सरकारतर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले होते. न्यायालयात साक्षीच्यावेळी साक्षीदाराने फुटले होते. मयताचा मृत्यूपूर्व जबाब आणि सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोघींना जन्मठेप आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे अॅड.दत्तूसिंग पवार तर आरोपीतर्फे अॅड. व्हि.डी फताटे यांनी काम पाहिले.