● निवडणुका लागतील, तेव्हा ‘मनसे’ सत्तेत असणार
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. Thackeray lost his post as chief minister because he got his way; Raj Thackeray’s Brother Uddhav Thackeray Tola MNS Vardhapan Maharashtra Navnirman Sena यावेळी त्यांनी आपल्या वाटेला गेल्यामुळे ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले असा गौप्यस्फोट केला. ‘भोंग्यांविरोधात आंदोलन झाले तेव्हा महाराष्ट्रभर माझ्या 17 हजार महाराष्ट्र सैनिकांविरोधात केसेस टाकल्या गेल्या. बोललो ना वाटेला जायचे नाही. मुख्यमंत्री पदावरुन जावे लागले,’ असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी (ता. ९) ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुका जेव्हा लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
‘संघर्षाची तयारी, पुन्हा एकदा भरारी’ या टॅगलाईनसह राज ठाकरे यांनी मनसेच्या पुनर्निर्माणाचे शिवधनुष्य हाती घेत गुढीपाडव्याचा टीझर दाखवून डिजिटली प्रचाराचा नारळ फोडला. भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी संदीप देशपांडेच्या हल्लेखोरांचा उल्लेख करून, मी माझ्या कार्यकर्त्याचे रक्त वाया जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा दिला. गेल्या १७ वर्षांतील आंदोलनांसह विविध कामगिरीचा आढावा घेणार्या ‘आम्ही काय केले’ या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन व मनसेच्या संकेतस्थळाचे अनावरण राज यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मनपा निवडणुकांचे मार्च-ऑक्टोबर सुरू असल्याने गेली दोन वर्षे नापास झाल्यासारखे वाटत असल्याची मिश्कील टीकाही त्यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Video | MNS chief Raj Thackeray launched party website & released a booklet highlighting the work done by his party on occasion of 17th foundation day of Maharashtra Navnirman Sena. We will be part of power in Mumbai & other Corporations, he said at convention held in Navi Mumbai pic.twitter.com/QZaSwIYdt4
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) March 9, 2023
राज ठाकरे म्हणाले, मनसेच्या सभेला गर्दी होते, पण मते मिळत नाहीत हा प्रोपोगेंडा आहे. आपली सत्ता नसताना सभेला होणारी गर्दी हीच पक्षाची ऊर्जा आहे. सध्याच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. त्यामुळे मनसे सत्तेपासून दूर नाही. बहुमत हाती यायला भाजपला १९५२ ते २०१४ इतका वेळ वाट पाहावी लागली. मात्र, मनसेला एवढा वेळ लागणार नाही. मी बहुमत लवकर आणणार. त्यामुळे मनसे सत्तेपासून दूर नाही. मी फक्त आशा दाखवत नाही. मला माहिती आहे. आपल्याला महानगरपालिका जिंकायच्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण सत्तेत असणार म्हणजे असणार, असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
सध्या जनता या सर्वांना विटलेली आहे. मी बोलत राहणारच. मी मतदारसंघापर्यंत भाषणासाठी येईल. पण तुम्ही प्रत्येक घराघरांपर्यंत जा. आपण सत्तेपासून दूर राहणार नाहीत. लवकरच सत्तेत येण्यासाठी नवे निर्माणाचे काम आपण करणार आहोत. मशिदींवरील भोंग्याबाबत आंदोलन केले होते. तेव्हा १७ हजार केसेस मनसैनिकांवर दाखल केल्या गेल्या. पण मी सांगितले होते आपल्या वाट्याला जायचे नाही. शेवटी मुख्यमंत्री पदावरून जावे लागले, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
इंदू मिलमध्ये इतकी मोठी वास्तू उभी राहिली पाहिजे, ग्रंथालय उभे राहिले पाहिजे की आख्खे जग तिथे ज्ञान मिळवायला बाबासाहेबांच्या चरणी आले पाहिजे. पुतळे उभे करून हाती काही लागत नाही. खरे सांगतो, महाराष्ट्राचे काही खरे नाही. आता जे काही चालू आहे, ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे आहे. असा महाराष्ट्र मी कधीही पाहिला नव्हता. इतके गलिच्छ, घाण राजकारण, इतकी खालच्या थराची भाषा आजपर्यंत पाहिली नाही, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चौथ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद हनीफ खान उर्फ पप्पू खान असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी विकास चावरिया, अशोक शंकर खरात आणि किसन पुरुषोत्तम सोलंकी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मार्निंग वॉकसाठी गेलेल्या संदीप देशपांडे यांच्यावर चार जणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केला होता.