पंढरपूर – भर रस्त्यावर प्रदक्षिणा मार्गावरील जय भवानी चौकात एका युवकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना आज सोमवारी रात्री घडली. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. सलग दुसऱ्या दिवशी पंढरपुरात कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. In Pandharpur Pandhari, Koyta started running; Youth seriously injured in attack on Pardakshina Marg
पुण्यात कोयता गॅंग यांची दहशत होती. मात्र पंढरपुरात प्रत्यक्षात माणसांवर कोयते चालायला लागले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पंढरपुरात कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे
या हल्ल्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथील निखिल कांतीलाल कांबळे (वय 23) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाद्वार चौकाच्या नजिक जय भवानी चौक असून आज सोमवारी (ता.13) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास निखिल कांबळे याच्यावर हा हल्ला झाला.
तीन अज्ञात तरुणांनी निखिल याच्या हातावर, पाठीवर कोयत्याने वार करून ते तेथून पसार झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे या परिसरातील व्यापारी व वारकरी यांच्यामध्ये घबराट पसरली होती. अनेकांनी आपली दुकाने बंद केली.
तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरला गुंडगिरी नवीन नाही. यापूर्वी अनेक हत्यारे बंदुका येथे सर्रास चालत होते. मात्र मध्यंतरी तीर्थक्षेत्र असणारे गाव शांत झालं होतं, मात्र आता पुन्हा प्रदक्षणा मार्गासारख्या धार्मिक जागांवर देखील कोयत्याने हल्ले होऊ लागले आहेत, ही चिंचेची बाब मानली जात आहे.
दरम्यान हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून शुभम लकेरी (रा. पंढरपूर ) याच्यासह 2 आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी दैनिक सुराज्य शी बोलताना सांगितली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 शेतजमिनीचा उतारा देण्यासाठी तलाठ्याने घरातच घेतली लाच
सोलापूर : शेतजमिनीची उतारा देण्याकरिता तलाठ्याने ३५ हजाराची मागणी केली होती, यांपैकी पहिला हफ्ता म्हणून १० हजार रूपयाची रक्कम घेताना संबंधित तलाठ्याला रंगेहात पकडले आहे.
सहदेव शिवाजी काळे (वय ५४) असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, शेतजमिनीची फोड करून विभक्त करण्याकरिता तक्रारदार यांनी सज्जा कार्यालय, दहिवली येथे अर्ज केला होता. सदर अर्जानुसार शेतजमिनीची फोड करून विभक्त करण्याची कार्यवाही करण्यासाठी व त्याबाबतचा ७/१२ उतारा देण्याकरिता तलाठी यांनी ३५ हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य करून त्यातील पहिला हप्ता १० हजार रूपये लाच रक्कम निवासस्थानी स्वीकारले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरच्या पथकाने रंगेहात पकडले.
दरम्यान, ही कारवाई पर्यवेक्षक अधिकारी गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार पकाले, जाधव, सण्णके, चालक पोलिस शिपाई सुरवसे यांनी बजाविली.