》 मंद्रूप – सोलापूर – मुंबई असा मार्ग असणार, रोज 25 कि.मी. प्रवास; सोळा दिवसांत गाठणार ‘वर्षा’
दक्षिण सोलापूर : मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या ७/१२ उता-यावर एमआयडीसीची नोंद केली आहे, ही नोंद रद्द व्हावी, यासाठी आंदोलक शेतकरी महादेव कुंभार व प्रवीण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी मंद्रूपहून अखेर बैलगाडी मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. The protesting farmers of Mandrup finally left the bullock cart march for Mumbai MIDC registered Satbara Solapur
या परिसरातील काही शेतकऱ्यांची जमीन देण्यास संमती नसतानाही ७/१२ उता-यावर एमआयडीसीची नोंद केली रद्द केली जात नाही. यासाठी ग्रामपंचायतीसमोर अनेक दिवस आंदोलन सुरू आहे, तरीही नोंद रद्द होत नसल्याने अखेर १४ मार्च रोजी शेतकरी मंद्रूप ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय तिथून मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना कुंभार म्हणाले, काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आणि राजकीय नेत्यांच्या दबावामुळे काही संमती नसलेल्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर एमआयडीसीची नोंद झाली आहे. हे नोंद रद्द व्हावे यासाठी शेतकरी गेल्या चार वर्षापासून निवेदने दिली आहेत. अद्यापही उतारा-यावरील नोंद कमी झाले नाही, सध्या प्रकरण उच्च अधिकार समितीकडे प्रलंबित आहे, या समितीची बैठक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत जमीन देण्यास विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या उतारावरील एमआयडीसीची नोंद कमी व्हावी.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सहा महिन्यापासून आंदोलन सुरू असल्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. उता-यावर एमआयडीसीची नोंद असल्याने आम्हाला पीककर्ज व इतर कर्ज बँकेकडून मिळत नाही त्यामुळे आंदोलक शेतकरी चिंतेत आहेत. हे आंदोलन शासनाने लवकर मिटवावेत, असेही
प्रवीण कुंभार यांनी म्हणाले.
मंद्रूपमधून निघाल्यानंतर दिवसाला २५ किलोमीटर अंतर कापण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी बैल थकतात, त्या ठिकाणी विसावा घेत पुन्हा पुढे कूच करण्यात येणार आहे. मुंबईला पोहोचण्यास किती दिवस लागतात माहीत नाही, तरीही १५ ते १६ दिवसांत पोहोचण्याचे नियोजन असल्याचे प्रवीण कुंभार यांनी सांगितले.
पाच बैलगाड्या अन् बैलांसाठी एक टेम्पो चारा अन् पाण्याचा टँकर घेतले आहे. खाण्या-पिण्याची,’ राहण्याची पर्वा न करता हे शेतकरी मंबईकडे निघाले आहेत. या बैलगाडी मोर्चामध्ये १२ महिला आहेत. सात-आठ लहान मुले आहेत. सुमारे ८० शेतकरी शेतकऱ्यांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे महादेव कुंभार यांची नात आठ महिन्यांची तान्हुली अन्वी रविकांत कुंभार हिचा देखील त्यात समावेश आहे.
एमआयडीसीसाठी भूसंपादन केलेल्या सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्यासाठी मागील १७५ दिवसांपासून शेतकरी मंद्रूप ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन केले. मात्र, कोणीच दखल न घेतल्याने वैतागलेले शेतकरी आता मुंबईतील ‘मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धडकणार आहेत. बैलगाडी मोर्चा घेऊन हे शेतकरी आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
मंगळवारी मंद्रूपहून निघालेले शेतकरी सोलापूरजवळील ए.जी. पाटील कॉलेजसमोरील मैदानावर विसावले आहेत. आज बुधवारी सकाळी पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच केले. या बैलगाडी मोर्चात महादेव कुंभार, प्रवीण कुंभार, बाबू मेंडगुदले, मलकारी जोडमोठे, अनिल मेंडगुदले, गजानन शेंडगे, राम कुंभार, बाळू शेंडगे, राहुल कुंभार, बसवराज कुंभार, दयानंद म्हेत्रे, महादेव खांडेकर आदी शेतकरी उपस्थित होते.