● मिळकत कर थकबाकीपोटी केले ५ गाळे सील
सोलापूर : महापालिका मिळकत कराची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मालमत्ता कर विभागाच्या विशेष पथकाकडून कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत आज गुरुवारी वसुलीबरोबरच थकित कर न भरणारे ५ गाळे सील करण्यात आले आहेत. Seal Solapur has taken action on 30 incomes so far in the municipal corporation’s strike campaign in the city
सोलापूर महापालिकेच्या मिळकतकर विभागाने चालू आर्थिक वर्षात दिलेल्या ५०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी केवळ १५१ कोटी रुपयेच वसूल केले आहेत. यामुळे मार्च अखेरपर्यंत त्यांना आणखी पन्नास कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी विभागाकडून जोरदार धडपड सुरू झाली आहे.
यापूर्वी अभय योजना मुदत संपल्यानंतर जानेवारीमध्ये या विभागाने वसुली आणि कारवाई मोहीम हाती घेतली होती. यादरम्यान त्यांनी २० कोटींवर कराची वसुली केली होती. तर या कारवाई मोहिमेत भवानी पेठ, रविवार पेठ, उत्तर कसबा, दक्षिण कसबा, उत्तर सदर बाजार, दक्षिण सदर बझार, विडी घरकुल, ६१ पेठ, ५८ पेठ, रेल्वेलाईन आदी परिसरातील १९ मिळकतदारांचे १४ गाळे, एक कार्यालय, आणि नळजोड तोडण्याची कारवाई केली होती.
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांच्यामार्फत पथकांकडून व झोन कर्मचाऱ्याकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी मालमत्ता कर विभागातील विशेष पथकाने सिव्हीललाईन, ६८ पेठ, मुरारजी पेठ, रेल्वेलाईन , उत्तर कसबा आदी परिसरातील ११ थकीत मिळकतदारांकडून त्यांच्या असलेल्या १० लाख २४ हजार १८५ रुपयांच्या थकबाकीपैकी ५ लाख ७२ हजार २४६ रुपयांचा कर वसूल केला.
मुरारजी पेठ येथील नन्हे खान यांचा एक गाळा, उत्तर सदर बाजार येथील संजय मोटगे, प्रदीप मोटगे यांचे २ गाळे, रेल्वे लाईन परिसरातील जाहेब बोहरी यांचा एक गाळा, उत्तर कसबा येथील राजकुमार राजदेव यांचा एक गाळा असे ५ गाळे सील करण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात कारवाईची मोहीम तीव्र करण्यात येणार असून यासाठी विविध पथके तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.
कटू कारवाई टाळण्यासाठी शहरातील थकबाकीदारांनी कर भरावा, असे आवाहन महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 17 रस्त्यांपैकी अकरा रस्त्याचे काम पूर्ण अपूर्ण काम असलेल्या मक्तेदारांना दंडात्मक कारवाई करून मुदतवाढ
सोलापूर : सोलापूर शहरातील 24 कोटी निधीतून करण्यात येत असलेल्या एकूण 17 रस्त्यापैकी 11 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. सहा रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झाली नसून न होणाऱ्या कामासंदर्भात संबंधित मक्तेदारांना दंड आकारून मुदतवाढ देणे किंवा री टेंडर काढण्यासंदर्भात विचार केला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
सोलापूर शहरात 17 रस्त्यांची कामे सुरू होती त्यापैकी 11 रस्त्यांची कामे आत्तापर्यंत पूर्ण झाले आहेत हे रस्ते या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदत होती दरम्यान ज्या रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत त्याचा मक्ता व करारानुसार सर्व आढावा घेण्यात येईल त्यानुसार न केलेल्या कामासंदर्भात दंड आकारून मुदतवाढ देणे अथवा घरी टेंडर काढण्या संदर्भातला विचार सुरू आहे असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले
● 70 फूट रोड बेडर पूल यासह इतर सहा रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे
सर्व टेंडर पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व इतर कामे करणे आवश्यक आहे, त्या अनुषंगाने येत्या मार्च अखेर पूर्वीच अशा कामांचे टेंडर काढण्याचा काढण्याचे नियोजन आहे यामुळे जुलै अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होऊ शकतील असेही महापालिका आयुक्तांनी यावेळी सांगितले
¤ स्मार्ट सिटी अंतर्गत 47 पैकी 40 कामांचे महापालिकेकडे हस्तांतरण, दुहेरी पाईपलाईन सोडून इतर सर्व कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील
सोलापूर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात 47 पैकी 40 कामांचे चाळीस कामे पूर्ण करून सर्व कागदपत्रांसह महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत दुहेरी जलवाहिनी सोडून उर्वरित इतर सर्व कामे येत्या एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी दिली.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात विविध कामे हाती घेण्यात आली होती त्या एकूण 47 कामांपैकी आतापर्यंत 40 कामे पूर्ण करून कागदपत्रांसह ती महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत यामध्ये रंगभवन प्लाझा इंद्रभवन इमारत पार्क स्टेडियम एडवेंचर पार्क हो मैदान विविध रस्ते यासह अन्य कामे अन्य 40 कामे पूर्ण झाली आहेत दरम्यान दुहेरी जलवाहिनी च्या कामात काम पूर्ण करण्याची मुदत 21 महिने पर्यंतचे आहे इतर स्मशानभूमी कमांड अँड कंट्रोल सेंटर व स्काडा प्रणाली आधी कामेही एप्रिल आकार पर्यंत पूर्ण होतील असेही महापालिका आयुक्त शितल उगले यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीतील कामासाठी जून 23 पर्यंत मुदत वाढ
स्मार्ट सिटी योजनेसाठी येथे जून 2023 पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे यामुळे उर्वरित सर्व कामे त्यात पूर्ण करण्यात पूर्ण होतीलच असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.