गांधीनगर : सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावावरुन केलेल्या वादग्रस्त विधानावरुन 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यावरुन आता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. Congress leader Rahul Gandhi’s candidature canceled by Surat court राहुल गांधी यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना दिलासा मिळाला नाही आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका सभेत त्यांनी ‘सगळे मोदी चोर आहेत’ असे वक्तव्य केले होते.
छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले. ओबीसी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी निषेधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे शेकडो पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडेही यावेळी मारले. राहुल गांधी यांनी मोदी यांच्याविरोधात वक्तव्य केले होते.
कर्नाटकमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर सुरत न्यायालयाने त्यांना काल गुरुवारी (23 मार्च) दोन वर्षांची शिक्षा सुनावली. याचे पडसाद आज उमटले असून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याबाबत कायद्यात नेमकी काय तरतूद आहे.
लोकशाही प्रक्रिया धोक्यात आली आहे. राहुल गांधी हे भ्रष्टाचाराविरोधात बोलत आहेत. मात्र त्यांना बोलू दिले जात नाही. लोकशाही व्यवस्था नष्ट करण्याचे काम हे भाजपा सरकार करत आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोलेंनी भाजपावर केली आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचाही निषेध केला. राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेवरुन लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे.
#WATCH | Maharashtra Congress chief Nana Patole says, "We condemn the way in which #RahulGandhi is disqualified…On the basis of Surat Court verdict, under Modi Govt's pressure, Lok Sabha disqualified him…If action is taken on calling someone "chor", we'll call them "daaku." pic.twitter.com/K5aqkZ2xeg
— ANI (@ANI) March 24, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Wayanad MP Rahul Gandhi is disqualified as a Loksabha Member after getting convicted in a criminal case in Surat. pic.twitter.com/SMFDYyorEC
— Ashish (@aashishNRP) March 24, 2023
नीरव मोदी प्रकरणाबद्दल बोलत असताना राहुल गांधींची जीभ घसरली होती. राहुल गांधीची तूर्त दहा हजारांच्या जामीनावर सुटका झाली होती.राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या समाजाबद्दल वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद संसदेतही उमटले. राहुल गांधींविरोधात सत्ताधारी खासदारांनी आंदोलन केले.
ललित मोदी, नीरव मोदी यांनी केलेल्या गैरव्यवहाराबद्दल बोलताना राहुल गांधींनी “सर्वच मोदी चोर असतात,” असे वक्तव्य राहुल गांधींनी केले. या प्रकरणात समाजाच्या वकिलांनी राहुल गांधींविरोधात खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी आपले वक्तव्ये हे ललित आणि नीरव मोदींविरोधात भ्रष्टाचाराविरोधात होते, असे म्हटले आहे. मात्र, राहुल गांधी हे सतत अवमानजनक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते भारतातच नव्हे तर देशाबाहेर जाऊनही देशाचा अवमान करत असतात, असा दावा राहुल गांधींच्या प्रतिवाद्यांनी केला होता.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करत म्हटले की, काँग्रेस नेते आणि पक्षाने त्यांच्या अहंकारापुढे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या. राहुल यांच्या या अपमानाचा बदला हा ओबीसी समाज घेईल. जेपी नड्डा यांनी अनेक ट्विटमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर हल्ला चढवला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना ओबीसी समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल गुरुवारी शिक्षा सुनावली आहे. पण तरीही ते आणि त्यांचा काँग्रेस पक्ष त्यांच्या उद्दामपणासमोर त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले ज्यामुळे ओबीसी समाजातील लोक दुखावले आहेत.