○ पुढील आंदोलन आझाद मैदानावर
अक्कलकोट : समृद्धी महामार्गाप्रमाणे सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी ३० एप्रिलनंतर एक मोठे जनआंदोलन उभारु, ग्रीन फील्डचा मोबदला एकरी आहे तर समृद्धी महामार्गाचे मोबदला स्केअर फुटावर आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसायचे नाही, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. Akkalkot: Get price like Samriddhi Highway; Green Field Sangharsh Samiti Road Block Siddharam Mhetre
सोलापूर जिल्ह्यातील सुरत – चेन्नई बाधित शेतकऱ्यांना समृद्धी प्रमाणे भाव मिळावा यासाठी अक्कलकोट येथील सोलापूर- अक्कलकोट रस्त्यावर आज सोमवारी (ता.27) बॅगेहळ्ळी फाट्याजवळ ग्रीन फील्ड संघर्ष समितीच्या वतीने या लाक्षणिक रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी म्हेत्रे बोलत होते.
यामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, कासेगाव, तुळजापूर, बार्शी येथील सर्वपक्षीय नेते मंडळी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळासाहेब मोरे आणि स्वामीनाथ हरवाळकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरत – चेन्नई हरित महामार्गासाठी अत्यल्प मावेजा देऊन शासनाने पाच जिल्ह्यातील शेतकरी संपवण्याचा डाव आखला आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनात उपस्थित राहून रोष प्रकट केला. हे आंदोलन दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झाले.
या रास्ता रोको आंदोलनमध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ग्रीन फील्ड संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, कार्याध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर, प्रगतशील शेतकरी माजी नगरसेवक महेश हिंडोळे, प्रगतशील शेतकरी सुरेखा होळीकट्टी,राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर, माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील,
ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी ताराबाई हांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष केंगनाळकर,जिल्हा महिला प्रमुख प्रिया बसवंती, तालुका प्रमुख आनंद बुक्कानुवरे,आर पी आय चे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे,रयत क्रांतीचे तालुका प्रमुख नागेश नाईकवाडी, रयत क्रांतीचे महिला तालुका प्रमुख प्रियांका दोड्याळे, सरपंच चिदानंद उण्णद, चंद्रकांत इंगळे, समाजसेवक सिध्दाराम भंडारकवठे, सरपंच सिध्दार्थ गायकवाड, वंचित आघाडी चे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता माडकर, प्रगतशील शेतकरी कालिदास वळसंगे,पंडित पाटील,रयत क्रांती ओबीसी सेल तालुका अध्यक्ष राजकुमार कोळी, श्रीशैल धनशेट्टी, रामेश्वर बिराजदार, मल्लिकार्जुन बिराजदार,कलय्या स्वामी, सरदार धनशेट्टी, सिध्दाराम अंकलगे, नितीन लोके,शिवराज स्वामी, अमोल वेदपाठक, महेश भोज,विक्रम गाडवे, परमेश्वर गाडवे,श्रीशैल येनगुरे,श्रीशैल भोज,ताजोद्दीन शेख, अंबादास हेडे,सादिक पठाण,दिपक कदम,वाहिद काझी यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांना लेखी निवेदन देण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक महेश स्वामी, पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महेश हिंडोळे, स्वामीनाथ हरवाळकर, आनंद बुक्कानुरे, सुनिल बंडगर, सुरेखा होळीकट्टी, बाळासाहेब मोरे, अविनाश मडिखांबे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व पक्षीय नेतेगणांनी पाठिंबा दर्शविला. जवळपास अर्धा तास चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याने रस्ता बंद होऊन वाहनांची लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पुढील आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्याचे या आंदोलनात ठरले.
बाळासाहेब मोरे म्हणाले, न्याय मिळविण्यासाठी पेटून उठले पाहिजे. कुरनूर धरणाच्या वेळी देखील असच झाले होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी व खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी मिटींग लावली पाहिजे, नाहीतर काहीच साध्य होणार नाही. सरकारला दखल घेण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार. या सुरत चेन्नई ग्रीन फील्ड मोबदला संदर्भात दोनच आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला आहे. दुसरे कोणीच नाही. आमदार व खासदारांनी यात लक्ष घालून न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावेत, अशी मागणी केली.
अविनाश मडिखांबे यांनी शेतकऱ्यांवरती घोर अन्याय होत असल्याचे म्हटले. योग्य मोबदला मिळाला पाहिजे. समृध्दी महामार्ग प्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे. आनंद बुक्कानुवरे यांनी शेतक-यांचा क्रुर चेष्टा करत असल्याचे म्हणत माजी मंत्री म्हेत्रे यांना आमचा पाठिंबा असल्याचै म्हटले. आमदार कल्याणशेट्टींनी शेतकऱ्यांच्या पाठिशी असले पाहिजे. आमदार व पालकमंत्री यांनी शेतक-यांची थट्टा केल्याचा आरोप केला.
सुनील बंडगर यांनी पालकमंत्री बैठक लावतो म्हटले पण लावण्यात आली नसल्याचे म्हटले. स्वामिनाथ हरवाळकर यांनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे डाव असल्याचा आरोप केला. आम्ही शेतकरी बांधव समृद्धी प्रमाणे योग्य मोबदला मिळेपर्यंत ग्रीन फील्ड संघर्ष समितीचा लढा यापुढे ही तीव्र करणार असल्याचे म्हटले. सुरेखा होळीकट्टी यांनी पक्ष नंतरचा आहे. सर्व शेतकरी संकटात सापडले आहेत. या दोन्ही पक्षाच्या कचाट्यात आम्ही शेतकरी बांधव सापडलो आहे. शासनापर्यंत आवाज पोहचला पाहिजे, अल्प दर देऊन आयुष्याची कमाई घेत असल्याचा आरोप केला.