सोलापूर – आमच्या एरियात काम करायचे असेल तर ५० हजाराची खंडणी दे, अन्यथा काम करू देणार नाही असे म्हणत केबल जाळून नुकसान केल्याची घटना तोंडले (ता.माळशिरस) येथे बुधवारी घडली. Solapur demanded a ransom of fifty thousand from the engineer of the mobile company
या प्रकरणात वेळापूरच्या पोलिसांनी अजित विलास कोडक (वय ३७ रा.तोंडले ता. माळशिरस) याला अटक करून खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
तोंडले येथील वेळापूर ते पंढरपूर रोडवर एअरटेल कंपनीचे केबल टाकण्याचे काम चालू आहे. हॉटेल शिवनेरीजवळ काम चालू असताना अजित कोडक हा काल दुपारी येऊन कामगारांना धमकी देऊन काम बंद पाडले. आणि केबलला आग लावली .तसेच या ठिकाणी काम करायचे असेल तर ५० हजार रुपये द्या नाहीतर काम करणाऱ्यांना दगडांना मारण्याची धमकी दिली. केबल जाळल्याने या परिसरातील नेटवर्क ५ ते ६ तास बंद पडले होते.
दरम्यान कंपनीचे अभियंता रमेश मुंशीलाल श्रीवास्तव यांनी वेळापूर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास फौजदार काझी करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● विजेच्या शॉक बसल्याने विवाहितेचा मृत्यू
सोलापूर – पत्र्याच्या शेडमध्ये फरशी पुसत असताना विजेचा शॉक बसल्याने ३८ वर्षीय महिला मरण पावली. ही घटना चंद्राळ (ता.दक्षिण सोलापूर) येथे आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
शमशाद मेहबूब शेतसंदी (वय ३८ रा.चंद्राळ) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. आज गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या शेतातील पत्रा शेडमध्ये फरशी पुसत होत्या. त्यावेळी हाताला पत्र्याच्या स्पर्श होऊन शॉक बसल्याने त्या बेशुद्ध झाल्या . त्यांना उपचारासाठी अल्लाउद्दीन (दीर) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णाला दाखल केले असता त्या उपचारापूर्वी मयत झाल्या. मयत शमशाद यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .