○ चार राज्यांच्या निकालावर अजित पवारांचे विधान
मुंबई : कोणी काहीही म्हटलं तरी, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. 4 राज्यांच्या निकालावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. A white line on a black stone, the country has no choice but Modi केसीआर महाराष्ट्रात फिरले, सर्व टीव्ही चॅनलवर जाहिराती दिल्या, आताच्या निकालावरुन त्यांची परिस्थिती बिकट वाटते, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपा येईल, असे चित्र आहे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 3 राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर भाजपाचे अभिनंदन केले. त्यांनी, ‘मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या उल्लेखनीय विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. हा शेतकरी, मजूर, तरुण आणि महिलांचा विजय आहे. भारतीय जनतेने काँग्रेसऐवजी भाजपला निवडले. नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मतदारांना पुन्हा एकदा प्रेरणा दिली आहे, असे शिंदेंनी x वर म्हटले.
भाजप उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेशमध्ये सत्तेत आहे. भाजप मध्य प्रदेशात सत्ता कायम ठेवणार आहे. राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे. मात्र, हरियाणात भाजपची जननायक जनता पक्षाशी (जेजेपी) युती आहे. याशिवाय भाजप महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांतील सत्ताधारी आघाडीचा भाग आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भाजपला तीन राज्यांत बहुमत मिळत असल्याने ‘एनडीए’तील नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. या अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच भाजपचा चेहरा मोदीच आहेत हे त्रिवार सत्य असून, नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असं ते म्हणाले आहेत.
मी आधीच म्हटलं होतं, की निकाल चांगलाच लागेल. पंतप्रधान मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीन राज्यांतील लोकांनी भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे जनतेचा कौल मान्य केला पाहिजे. मात्र, ‘इंडिया आघाडी’वाले आता ‘ईव्हीएम’बाबत बोलतील, पण जनतेने भाजपवर आत्मविश्वास दाखवला आहे. मोदी दिलेला शब्द पाळतील, असा विश्वास आहे. कारण गेल्या दहा वर्षांत मोदींनी अनेक चांगली कामं केली आहेत, असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत असून, गेल्या दहा वर्षांत त्यांनी अतिशय चांगल्या योजना राबवल्या आहेत, पण या निवडणुकीत काहींनी नको तेवढा आत्मविश्वास दाखवला,” असा टोलाही उपमुख्यमंत्री पवार यांनी विरोधकांना लगावला. तसेच मोदींपुढे दुसरा कोणीही चेहरा नाही, असेही पवार म्हणाले.