दमास्कस, 23 जून (हिं.स.) :
सीरियाची राजधानी दमास्कसमधील एका चर्चमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात किमान २२ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर ६३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यासंदर्भात
सीरियाच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आत्मघातकी
हल्लेखोराने आत प्रवेश केला आणि गोळीबार केला आणि स्फोट घडवून आणला. आत्मघाती
बॉम्बर हा इस्लामिक स्टेट म्हणजेच आयएसचा सदस्य होता.
सीरियाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. “आम्ही दुवैला येथील चर्चवरील या दहशतवादी
हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि मृतांच्या कुटुंबीयांना आमच्या तीव्र संवेदना
व्यक्त करतो. हे भ्याड कृत्य आपल्या एकता आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर हल्ला असल्याचे सिरियाने आपल्या संदेशात म्हंटले आहे.
—————