Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दोन हजाराच्या सव्वा कोटी नोटा देतो म्हणून 25 लाखास गंडविले, माळशिरस तालुक्यातील घटना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

दोन हजाराच्या सव्वा कोटी नोटा देतो म्हणून 25 लाखास गंडविले, माळशिरस तालुक्यातील घटना

Surajya Digital
Last updated: 2023/07/16 at 10:29 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

सोलापूर – तुम्ही आम्हाला २५ लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला २ हजार रुपयाच्या सव्वा कोटीच्या नोटा देतो. अशी थाप मारून पुण्यातील तिघा भामट्यानी भांबुर्डी येथील इसमास पंचवीस लाख रुपयास गंडविले. 25 lakhs was stolen for giving Rs 2,500 crore notes, incident in Malshiras taluka

ही घटना भांबुर्डी (ता. माळशिरस) येथे शनिवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास घडली. यासंदर्भात नामदेव जयराम वळकुंद्रे (वय २९ रा.मेडद ता.माळशिरस) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे माळशिरसच्या पोलिसांनी नवनाथ उर्फ नाथा (रा वाघोली जि .पुणे) आणि त्याच्या दोघा साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नामदेव वलकुंद्रे (रा.मेडद) यांचा माळशिरस परिसरात गॅरेजच्या व्यवसाय आहे. त्यांचे मामा सोमनाथ वाघमोडे हे भांबुर्डी येथे राहतात. पुण्यातील त्यांच्या परिचयात असलेल्या नवनाथ उर्फ नाथा याने वाघमोडे यांना आमच्याकडे दोन हजार रुपये किमतीच्या भरपूर नोटा आहेत. तुम्ही आम्हाला शंभर आणि पाचशे रुपयाच्या नोटा दिल्यास आम्ही तुम्हाला पाचपट दोन हजार रुपयाच्या नोटा देतो असे सांगितले होते.

 

त्याप्रमाणे सोमनाथ वाघमोडे यांनी शनिवारी दुपारी नवनाथ उर्फ नाथा याला २५ लाख रुपये दिले. त्यानंतर तिघांनी पैसे घेऊन पोबारा केला . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माळशिरस पोलिसात फिर्याद दाखल केली. पुढील तपास फौजदार पुजारी करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ जोडभावी पेठ पोलिसांनी चोराला अटक करून तीन दुचाकी जप्त केले

सोलापूर – जोडभावी पेठ पोलिसातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने नागेश भीमाशंकर पाटील (वय २८ रा. घोंगडेवस्ती ) या चोराला अटक करून चोरीस गेलेल्या तीन मोटरसायकली जप्त केले.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भवानी पेठ येथील प्रभाकर सिंगरल यांच्या घरासमोरुन दुचाकी चोरीस गेली होती. त्याप्रमाणे त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. चोरीस गेलेली दुचाकी नागेश पाटील याने पळविली असून तो दहिटणे येथे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी त्याला शनिवारी दहिटणे येथे दुचाकीसह अटक केली. त्यावेळी त्याने आणखीन दोन दुचाकी चोरल्याचे कबुली दिली. पोलिसांनी तिन्ही दुचाकी जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पवार, हवालदार आरेनवरू,श्रीकांत पवार, शिवशरण, सरवदे आणि कसगावडे यांनी केली.

 

○ मजूर पुरवतो म्हणून करंजे येथील शेतकऱ्यास ५ लाखात गंडविले

सोलापूर – चालू गळीत हंगामासाठी ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून करंजे (ता. करमाळा) येथील शेतकऱ्यास ४ लाख ८० हजार रुपयास गंडविण्यात आले.

या प्रकरणात करमाळ्याच्या पोलिसांनी बाबूलाल दगडू पावरा (रा.बीडगाव ता.चोपडा जि.जळगाव) याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोपट धोंडीबा सरडे (रा.करंजे) यांनी पोलिसात नुकतीच फिर्याद दाखल केली. त्यांनी चालू गळीत हंगामासाठी बाबूलाल पावरा याच्यासोबत पांडे येथील विठ्ठल शुगरच्या कार्यालयात करार केला होता. त्यानुसार त्याच्या खात्यावर ४ लाख ८० हजार रुपये २५ जून २०२२ रोजी पाठविले होते. त्यानंतर पावरा याने एकही ऊसतोड मजूर पुरवला नाही.

 

कांही दिवसापूर्वी पावरा हा सरडे यांना करमाळा येथील बसस्टॅड येथे भेटला होता. त्यांनी करारासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी त्याने पैसे आणि मजूर पुरवणार नाही. असे म्हणून धमकी दिली होती, अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार रणदिवे पुढील तपास करीत आहेत .

 

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #25lakhs #stolen #Rs2, #दोन #हजार #सव्वाकोटी #नोटा #25लाख #गंडविले #सोलापूर #माळशिरस #तालुका #घटना, 500crore #notes #incident #Malshiras #taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला : सर्व 9 मंत्र्यांनी शरद पवारांचे घेतले आशिर्वाद, दोन्हीकडून आल्या प्रतिक्रिया 
Next Article पावसाळी अधिवेशन : विरोधकांचा सभात्याग, विधानसभा पाठोपाठ विधानपरिषदही तहकूब

Latest News

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल
महाराष्ट्र May 30, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन
महाराष्ट्र May 30, 2025
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक
देश - विदेश May 30, 2025
भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक
महाराष्ट्र May 30, 2025
गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र May 30, 2025
नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान
देश - विदेश May 30, 2025
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
महाराष्ट्र May 30, 2025
पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
देश - विदेश May 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?