हैदराबाद, 28 जुलै – हैदराबादच्या नागोले स्टेडियममध्ये रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. २५ वर्षीय गुंडला राकेश याचा बॅडमिंटन खेळताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
राकेश हैदराबादमधील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी तो मित्रांसोबत बॅडमिंटन खेळण्यासाठी नागोले स्टेडियममध्ये गेला होता. खेळादरम्यान तो अचानक बेशुद्ध झाला आणि जमिनीवर कोसळला.
घटनेनंतर त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीनुसार, राकेशचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये राकेश खेळताना अचानक जमिनीवर कोसळताना दिसत आहे.
मृत राकेश हा खम्मम जिल्ह्यातील थल्लाडा गावातील माजी उपसरपंच गुंडला वेंकटेश्वरलू यांचा मुलगा होता.