Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आषाढीसाठी सोलापुरातून 250 जादा एसट्यांचे नियोजन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

आषाढीसाठी सोलापुरातून 250 जादा एसट्यांचे नियोजन

admin
Last updated: 2025/06/15 at 3:35 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 15 जून (हिं.स.)।

पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील विविध आगारांतून पाच हजार 300 एसटी बसचे नियोजन केले आहे. त्यात सोलापूर विभागामधून 250 अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध असणार असल्याची माहिती येथील आगार प्रशासनाने दिली.

राज्यासह कर्नाटक, आंध्र व तेलंगणासह परराज्यातील लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी येतात. याही वर्षीच्या आषाढीच्या निमित्ताने लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या मोठ्या एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अन्य जिल्ह्यातून येणार्‍या भाविकांची संख्या जास्त असते. या भाविकांना प्रवासाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व अतिरिक्त बससेवेच्या वाहतुकीचे नियोजन एसटीने केले आहे.

पंढरपूरच्या मुख्य बसस्थानकांतून वाढीव वाहतुकीची सोय केली आहे.आषाढी वारीच्या धर्तीवर एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह महिलांसाठी सवलतीतील तिकिटाचे दर जाहीर केले आहेत. 75 वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास, 65 वर्षांच्या पुढील नागरिकांना अर्धे तिकीट आणि महिलांना 50 टक्के सवलतीत प्रवास करता येणार आहे. रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत योजना बंद केल्याने वारकरी एसटीला पसंती देताना दिसत आहेत.

You Might Also Like

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती

इंद्रायणी घटना : दोघांचा मृत्यू तर ६ जणांना वाचवण्यात यश – मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे – सुळे

अनेक संकटे झेलत शेतकऱ्यांनी केली मशागतीला सुरुवात

अमरावती – दोन साधुंनी उडवली व्यापाऱ्याची चैन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे – सुळे
Next Article सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Latest News

इराणची धमकी, ट्रम्प यांचा थेट आणि कठोर इशारा
देश - विदेश June 15, 2025
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती
महाराष्ट्र June 15, 2025
इंद्रायणी घटना : दोघांचा मृत्यू तर ६ जणांना वाचवण्यात यश – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 15, 2025
मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार
सोलापूर June 15, 2025
सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू
सोलापूर June 15, 2025
शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे – सुळे
महाराष्ट्र June 15, 2025
सोलापूर विद्यापीठाचा भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार
सोलापूर June 15, 2025
खा. प्रणिती शिंदेचा स्वबळाचा नारा
सोलापूर June 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?