सोलापूर प्रतिनिधी
शहरातील 28 बेकायदा इमारतीवर कारवाईचा हातोडा चालणारच मात्र तत्पूर्वी न्यायाचा भाग म्हणून संबंधितांना आपली बाजू मांडता यावी याकरिता सुनावणी घेतली जाईल अशी माहिती पालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली
शहरातील बेकायदेशीर बांधकाम पालिकेच्या रडार वर आहेत एक नाही दोन नाही तर तब्बल 96 इमारती वादात सापडल्यात यातील 85 जणांनी कागदपत्र सादर केली आता यापैकी 28 इमारती अशा आहेत की जिथे पालिकेला हातोडाच चालवावा लागणार आहे अशातही पालिकेने या लोकांविरुद्ध काहीसं सबुरीच आणि न्यायाचं धोरण अवलं बलय शहरातील ज्या 28 इमारतींवर हातोडा चालवायची तयारी पालिकेने केलेली होती अशा लोकांचं म्हणणं पालिका पुन्हा एकदा ऐकून घेणार आहे उद्या कारवाई पूर्वी आमचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही अशी कुणाची तक्रार येऊ नये यासाठी बेकायदेशीर 28 इमारती संदर्भात आता सुनावणी घेतली जाणार आहे अर्थात आपली बाजू मांडण्याची संधी पालिकेने या लोकांना दिली आहे
अर्थात ज्या 28 इमारती पूर्णतः बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत तिथे बऱ्याच भानगडी दिसून येतात बांधकामाची नियमावली धाब्यावर बसवून टोलेजंग इमारती उभारण्यात आल्यात मध्यंतरी पालिकेत बोगस बांधकाम परवाना प्रकरण उजेडात आलं बांधकाम विभागातील काही अधिकारी गजाआड गेले अगदी काही खाजगी इंजिनियर्स विरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला यानंतर बेकायदेशीर बांधकामाची लबाडी समोर आली ज्यांनी संधी साधण्याचा प्रयत्न केला आता ते अडचणीत आलेत अशा इमारतींचे मजले पाडण्याची तयारी पालिकेने केलीये या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागल आहे दरम्यान आता पालिका आयुक्तांनी एक न्यायाची बाजू म्हणून संबंधितांचे म्हणणं ऐकून घेण्यासाठी या 28 इमारतींबाबत सुनावणीचा निर्णय घेतलाय यानंतर मात्र कारवाईचा हातोडा चालणार हेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं अशी बेकायदेशीर बांधकाम संपूर्णपणे जमीन दोस्त झाल्याशिवाय मस्तवाल वृत्तीला चाप बसणार नाही अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून व्यक्त होतीय