नवी दिल्ली , 24 जून (हिं.स.)।इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी चालवले जाणारे ऑपरेशन सिंधू सुरूच आहे. सोमवारी(दि. २३) रात्री महान एअरचे एक विशेष विमान २९० प्रवाशांसह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. दिल्लीला पोहोचलेल्या २९० प्रवाशांमध्ये श्रीलंकेची एक महिला फातिमा इमान देखील आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजता नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या विशेष विमानाने २९० भारतीय नागरिक आणि एका श्रीलंकेच्या नागरिकाला बाहेर काढण्यात आले.
भारत सरकारचे आभार मानताना फातिमा म्हणाली की ती ज्या विद्यापीठात शिक्षण घेत आहे तिथे अनेक भारतीय विद्यार्थी आहेत. भारतीय दूतावास आणि भारत सरकारने केलेल्या व्यवस्थेचे तिने कौतुक केले. पहिले विमान शुक्रवारी(दि.२०) रात्री उशिरा २९० भारतीयांसह नवी दिल्लीत उतरले आणि दुसरे विमान शनिवारी(दि.२१) दुपारी ३१० भारतीयांसह उतरले. गुरुवारी येरेवनहून आणखी एक विमान आले. शनिवारी सकाळी अश्गाबातहून एक विशेष विमान नवी दिल्लीत पोहोचले. भारताने आतापर्यंत २००३ जणांना परत आणले आहे.