Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हेलिकॉप्टर अपघातातील 7 मृतकांपैकी 3 जण महाराष्ट्रातील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

हेलिकॉप्टर अपघातातील 7 मृतकांपैकी 3 जण महाराष्ट्रातील

admin
Last updated: 2025/06/15 at 3:20 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग येथे पहाटे घडली दुर्घटना

डेहराडून, 15 जून (हिं.स.) : उत्तराखंडमध्ये आज, रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राज्यातील रुद्रप्रयागच्या गौरीकुंड परिसरात हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये 7 जण होते. यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांचा समावेश आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर प्रवाशांना घेऊन जात असताना पहाटे 5.30 वाजता गौरीकुंड परिसरात कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. गौरीकुंडच्या वर गवत कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली. या दुर्देवी अपघातातील मृतांमध्ये विक्रम (रुद्रप्रयाग उत्तराखंड) विनोद देवी ( बिजनौर उत्तरप्रदेश) तुस्ती सिंह (बिजनौर उत्तरप्रदेश), राजकुमार जयस्वाल (यवतमाळ, महाराष्ट्र), शारदा जयस्वाल (यवतमाळ, महाराष्ट्र), काशी (यवतमाळ, महाराष्ट्र) आणि कॅप्टन राजीव रेसी (राजस्थान) यांचा समावेश आहे. अपघाताला बळी पडलेले जयस्वाल कुटुंबिय महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी आहेत. तसेच मृतांमध्ये जयस्वाल कुटुंबातील काशी या अडीच वर्षीय बालिकेचा देखील समावेश आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हेलिकॉप्टर अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी, 8 मे रोजी राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यात देखील एक हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत पायलटसह 6 जणांचा मृत्यू झाला होता.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इस्रायलच्या हल्ल्यात इराणची संरक्षण मंत्रालय इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
Next Article विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार – प्रताप सरनाईक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?