Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Solapur bribe सोलापूर : अवघे तीनशे रुपये लाच घेताना महिला लिपिकाला रंगेहाथ पकडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

Solapur bribe सोलापूर : अवघे तीनशे रुपये लाच घेताना महिला लिपिकाला रंगेहाथ पकडले

Surajya Digital
Last updated: 2022/05/13 at 10:13 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
तुमचे आवडते  ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’ ‘कू’ Koo आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध○  गुरसाळे बंधाऱ्यावरील १२ लोखंडी दरवाजाची चोरी□ सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्या रद्द

सोलापूर : ‘आरटीई’तून प्रवेश मिळालेल्या एका मुलाच्या पालकाकडून पाचशे रुपयांची मागणी करून तीनशे रुपये घेताना महापालिका शिक्षण मंडळातील महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी रंगेहाथ पकडले. सेवा निवृत्तीला काही वर्षेच शिल्लक असताना त्या सापळ्यात अडकल्या आहेत. Solapur: A woman clerk was caught red handed while accepting a bribe of only Rs 300.

प्रभावती अंबादास वईटला (कस्सा) (वय 58) असे त्या लाचखोर महिला लिपिकाचे नाव आहे. ५८ वर्षीय महिला लिपिका काही वर्षाने रिटायर्ड होणार आहेत. मात्र त्यांना लाचेची दुर्बुद्धी सुचली आणि बक्षीस स्वरूपात ही रक्कम स्वीकारली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याअंतर्गत २५ टक्के मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे.

आरटीईअंतर्गत नंबर लागलेल्या मुलांचे प्रवेश सध्या सुरु आहेत. तक्रारदाराच्या मुलाचा ‘आरटीई’तून नंबर लागला होता. त्याचे प्रवेशपत्र दिल्यानंतर बक्षीस म्हणून पाचशे रुपयांची मागणी केली होती. तेवढे पैसे नसल्याने त्या महिला लिपिकाने तक्रारदाराकडून तीनशे रुपये घेतले.  यावेळेस परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला रंगेहाथ पकडले.

तुमचे आवडते  ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’ ‘कू’ Koo आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश महाडीक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शिपाई स्वप्निल सणके, प्रफुल्ल जानराव, अतुल घाटगे, शिरीषकुमार सोनवणे, अर्चना स्वामी यांच्या पथकाने केली.

 

○  गुरसाळे बंधाऱ्यावरील १२ लोखंडी दरवाजाची चोरी

सोलापूर – कवठाळी (ता.पंढरपूर) येथे गुरसाळे बंधाऱ्यावरील १२ लोखंडी दरवाजे चोरट्याने पळविले. ही चोरी काल गुरुवारी (ता. 12) पहाटेच्या सुमारास घडली. कवठाळी येथील गुरसाळे बंधाऱ्यावर लोखंडी दरवाजे बसविण्यात आले आहे.

पहाटेच्या सुमारास चोरट्याने एकूण १२ दरवाजे तोडून गेले. चोरीस गेलेल्या दरवाजाची किंमत ६० हजार इतकी असल्याची फिर्याद बाळू मारुती रोकडे (रा. चिंचोली भोसे ) या कर्मचाऱ्याने पंढरपूर ग्रामीण पोलिसात दाखल केली. सहाय्यक फौजदार दिवसे पुढील तपास करीत आहेत.

□ सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्या रद्द

 

सोलापूर :  सोलापूर विभागाने सोलापूरच्या दिशेच्या बाजूस दौंड यार्डमध्ये सबवे (रोड अंडर ब्रीज) बांधण्यासाठी १७ दिवसांसाठी १३ ते २९ मे पर्यंत वेगवेगळ्या कालावधी करिता ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या दरम्यान सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्या रद्द, आशिंक रद्द, मार्ग परिवर्तन करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

अंशिक व काही गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी रद्द करण्यात आलेल्या गाड्या व मार्ग परिवर्तन करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती घेऊन योग्य तो प्रवास सुनिश्चित करावा, असेही आवाहन करण्यात आले.

 

You Might Also Like

सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी

पंढरपूरात चंद्रभागेची पातळी इशारा सीमेला; सर्व घाट बंद, आठ बंधारे पाण्याखाली

सोलापूर जिल्ह्यात 1688 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार

सोलापुरातील 96 बेकायदा बांधकामांची यादी महापालिकेकडून जाहीर, नामवंत बिल्डर आणि नागरिकांचा समावेश

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन होणार – उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

TAGGED: #Solapur #woman #clerk #caught #redhanded #accepting #bribe #only #Rs300 #Board #Education #Municipal #Corporation, #सोलापूर #अवघे #तीनशे #रुपये #लाच #महिला #लिपिका #रंगेहाथ #शिक्षणमंडळ #महापालिका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Diesel home delivery आता डिझेलची मिळणार होम डिलिव्हरी; भारतात 200 शहरात योजना राबवणार
Next Article Mundka fire case दिल्लीतील इमारतीला भीषण आग, 27 जणांचा मृत्यू, दोन कारखाना मालकांना अटक

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?