Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ग्रामपंचायत शिपायावर मोहोळमध्ये कात्रीने हल्ला; टेलरला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

ग्रामपंचायत शिपायावर मोहोळमध्ये कात्रीने हल्ला; टेलरला अटक

Surajya Digital
Last updated: 2022/05/14 at 11:04 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
□ अस्थी विसर्जनासाठी आलेल्या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी पळविलीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…● गुरसाळे बंधाऱ्यावरील १२ लोखंडी दरवाजाची चोरी

सोलापूर – ग्रामपंचायतीच्या शिपायाला शिवीगाळ करीत कात्रीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना आष्टी (ता. मोहोळ) येथे बुधवारी (ता. 11) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात मोहोळच्या पोलिसांनी एका टेलरला अटक करून पोलिस कोठडी घेतली आहे. Taylor arrested for attacking Gram Panchayat peon with scissors

अमोल जगन्नाथ  होनकळस (वय ३७ रा. आष्टी) असे जखमी झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ते बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाकडे निघाले होते. त्यावेळी  टेलर दुकानातील मोहन बजरंग माने ( वय४०) याने त्याला ग्रामपंचायत कर्मचारी पैसे खाऊन काय पण काम करतात, असे म्हणत शिवीगाळ केली. होनकळस यांनी तू नेहमी मला शिवीगाळ का करतो? असे विचारले असता त्याने कात्री घेऊन त्यांना मारहाण केली. हाताला आणि गळ्यावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत .

□ अस्थी विसर्जनासाठी आलेल्या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी पळविली

सोलापूर – आजीच्या अस्थि विसर्जनासाठी कोल्हापूरहून आलेल्या एका तरुणीच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्याने पळविली. ही घटना पंढरपूर शहरातील नामदेव पायरीजवळ गुरुवारी (ता. 12) सकाळच्या सुमारास घडली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

श्वेता संजय शिंदे (वय २५ रा. करवीर जि. कोल्हापूर) ही तरुणी गुरुवारी मयत आजीच्या अस्थि विसर्जनासाठी पंढरपुरात आली होती. अस्थिचे विसर्जन केल्यानंतर ती विठ्ठल मंदिराचे दर्शन घेऊन नामदेव पायरी जवळ आली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तिच्या गळ्यातील ८ ग्रॅम सोन्याची चेन पळवली. या घटनेची नोंद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात झाली.  हवालदार ढेरे पुढील तपास करीत आहेत .

 

● गुरसाळे बंधाऱ्यावरील १२ लोखंडी दरवाजाची चोरी

 

सोलापूर – कवठाळी (ता.पंढरपूर) येथे गुरसाळे बंधाऱ्यावरील १२ लोखंडी दरवाजे चोरट्याने पळविले. ही चोरी काल गुरुवारी (ता. 12) पहाटेच्या सुमारास घडली. कवठाळी येथील गुरसाळे बंधाऱ्यावर लोखंडी दरवाजे बसविण्यात आले आहे.

पहाटेच्या सुमारास चोरट्याने एकूण १२ दरवाजे तोडून गेले. चोरीस गेलेल्या दरवाजाची किंमत ६० हजार इतकी असल्याची फिर्याद बाळू मारुती रोकडे (रा. चिंचोली भोसे ) या कर्मचाऱ्याने पंढरपूर ग्रामीण पोलिसात दाखल केली. सहाय्यक फौजदार दिवसे पुढील तपास करीत आहेत.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Taylor #arrested #attacking #GramPanchayat #peon #scissors #solapur, #ग्रामपंचायत #शिपाई #कात्री #हल्लाप्रकरणी #टेलर #अटक #मोहोळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Mundka fire case दिल्लीतील इमारतीला भीषण आग, 27 जणांचा मृत्यू, दोन कारखाना मालकांना अटक
Next Article Ketki Chitale’s post अभिनेत्री केतकी चितळेची पवारांवर खोचक टीका; केतकीवर गुन्हा दाखल

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?