Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिलीप मानेंच्या उपोषण आंदोलनाचा ‘धसका’; सुभाष देशमुखांचा पाठपुरावा आला ‘कामी’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

दिलीप मानेंच्या उपोषण आंदोलनाचा ‘धसका’; सुभाष देशमुखांचा पाठपुरावा आला ‘कामी’

Surajya Digital
Last updated: 2022/08/29 at 2:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ आ. सुभाष देशमुख यांच्या सूचनेनंतर आसरा पूल येथील रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू□ उड्डाणपुलाचे कामही लवकर सुरू होईल : आमदार देशमुख

 

सोलापूर – दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी 1 सप्टेंबरला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तर आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्तांशी पाठपुरावा केला होता. या आजी माजी आमदारामुळे कामाला गती आलीय. त्यामुळे दिलीप माने यांचा उपोषणाचा विचार बदलू शकतो. Dilip Mane’s hunger strike; Subhash Deshmukh followed up with Kami Asara Bridge

 

सोलापूर शहरातील रहदारीचे रस्ते तातडीने डांबरीकरण करा तसेच सोरेगाव मलनिस्सारण पाणी प्रश्न त्वरीत सोडवा या मागणीसाठी माजी आमदार दिलीपराव माने यांनी 1 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने आसरा ते डिमार्ट हा रस्ता रातोरात डांबरीकरण करण्याचे काम सुरु केले.

 

सोलापूर शहरातील अति रहदारी असलेले आसरा चौक ते डिमार्टपर्यंतचा रस्ता, सात रस्ता ते महावीर चौक पर्यंतचा रस्ता, महावीर चौक ते अशोक चौक मार्केट यार्ड पर्यतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज पुतळ्यापर्यतचा रस्ता, सिध्देश्वर प्रशाला ते सिध्देश्वर कन्या प्रशाला हे रस्ते तातडीने डांबरीकरण करुन नागरिक, वाहनधारकाची सोय करण्याची मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी केली होती.

महापालिका आयुक्तांशी दिलीप माने यांनी चर्चा केली होती. येणा-या 10 दिवसात रस्ता डांबरीकरण कामे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याशिवाय सोरेगाव येथील मलनिस्सारण पाण्याचा प्रश्न सोडवावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय नुकसानभरपाई मिळावी यासाठी देखील चर्चा केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ आ. सुभाष देशमुख यांच्या सूचनेनंतर आसरा पूल येथील रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू

सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचनेनंतर महापालिकेने आसरा येथील रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार देशमुख यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आसरा पूल येथील रस्ता डांबरीकरणासह अनेक मागण्या केल्या होत्या अखेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे.

 

आसरा पूल येथील रस्ता खराब झाला होता. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. महापालिकेने हे खड्डे बुडवण्यासाठी मुरूम टाकला होता. मात्र त्यामुळे अधिकच धूळ उडत होती. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत अनेक संघटना आणि नागरिकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती.

त्यानुसार आमदार देशमुख यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आसरा पूल येथील रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा आणि शहरातील इतर रस्त्यावरीलही खड्डे बुजवावेत, अशा सूचना केल्या होत्या. आमदार देशमुख यांनी वारंवार आयुक्तांनाही याबाबत सांगितले होते. अखेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आसरा पुलासह शहरातील इतर रस्ते डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

 

□ उड्डाणपुलाचे कामही लवकर सुरू होईल : आमदार देशमुख

आसरा पूल येथे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता आमदार देशमुख यांनी येथे उड्डाण पुलाच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली. त्यानुसार गडकरी यांनी 28 कोटीचा निधी देत प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच उड्डाणपुलाचे कामही सुरू होईल असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #DilipMane's #hunger #strike #SubhashDeshmukh #followedup #Kami #AsaraBridge, #दिलीपमाने #उपोषण #आंदोलन #धसका #सुभाषदेशमुख #पाठपुरावा #कामी #आसरापूल #
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राणी लक्ष्मीबाई मंडईतील 192 ओट्यांचा उद्या होणार लिलाव !
Next Article मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या उस्मानाबादच्या शेतकऱ्याचा उपचारावेळी मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?