अमरावती, 23 एप्रिल (हिं.स.) : जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्लाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अशातच पहलगामला येथे गेलेले अमरावतीचे 36 ही पर्यटक सुखरूप आहे. त्यामुळे अमरावतीत राहणाऱ्या पर्यटकांच्या कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला आहे. गोळीबार होण्याच्या काही मिनिटांआधी 36 पर्यटकांनी काढता पाय घेतल्याने अकरा ही पर्यटक सध्या सुखरूप आहेत.
अमरावतीचे 36 ही पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये आणि पहलगाम येथे सुखरूप असून श्रीनगरच्या आणि पहलगामच्या खाजगी हॉटेलमध्ये थांबून असल्याची माहिती आहे. मंगला बोडके, छाया देशमुख, निता उमेकर, चंदा लांडे आणि सारिका चौधरी यांचे हे कुटुंब आहे. —————