Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फताटेवाडी ग्रामपंचायतीत 4 कोटी 42 लाखांचा अपहार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

फताटेवाडी ग्रामपंचायतीत 4 कोटी 42 लाखांचा अपहार

admin
Last updated: 2025/03/19 at 11:14 AM
admin
Share
4 Min Read
SHARE

फताटेवाडी ग्रामपंचायतीत 4 कोटी 42 लाखांचा अपहार
सरपंच हरिशचंद्र राठोडांसह तिघांची पोलीस ठाण्यात निघणार वरात

– ‘कानून के हात लंबे होते है,’ अखेर बसला कायद्याचा हाबडा
– सार्वजनिक हिताच्या विकास कामांच्या निधीवर
डल्ला मारणचे प्रकरण अंगलट
– संगनमताने अपहार केल्याप्रकरणी
वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
– संबंधित संशितांच्या पोलीस ठाणे आणि कोर्टाच्या वार्‍या होणार सुरु

खास प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडीचे सरपंच हरिशचंद्र राठोड, उपसरपंच आर. व्ही. जाधव व ग्रामसेवक बी. डी. पाटील यांच्यावर 4 कोटी 42 लाख 91 हजार 993 रूपयाचा अपहरण केल्याप्रकरणी अखेर वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘कानून के हात लंबे होते है’ याचा प्रत्यय गुन्ह्यातील सर्व संशयितांना आला असून अखेर त्यांना कायद्याचा जोरदार हाबडा बसला आहे. अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सर्व संबंधितांना आता वळसंग पोलिस ठाण्यासह कोर्टाच्या वार्‍या कराव्या लागणार आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की, फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अपहरण झाल्याप्रकरणी फताटेवाडी येथील विनोद रमेश चव्हाण यांनी लोकआयुक्त व पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेवून जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला होता. तर याप्रकरणी विस्तार अधिकारी सदाशिव भिमशा कोळी यांनी फिर्याद दिली आहे.

फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये 1 एप्रिल 2023 ते 15 ऑक्टोंबर 2024 अखेर आर्थिक अपहर झाला आहे. विशेषतः तांत्रिक मान्यता व मोजमाप नोंदवहीमध्ये मूल्याकंन पूर्वी खर्च करणे, एकाच कामावर दोन वेळा खर्च करणे, एकाच कामाचे दुबार मुल्याकंन नोंदविणे, मुल्याकंन पूर्वी खर्च करणे, रोखीने खर्च, एकाच कामासाठी 2 यंत्रणा कार्यरत असणे, महाराष्ट्र ग्राम पंचायत लेखासंहिता नियम 2011 चे पालन न करणे, कर्मचारी वेतन व वैयक्तीक लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय व तांत्रीक मान्यता न घेणे, सन-2023-2024 मधील 15 वा वित्त आयोग अंतर्गत लेखा संहिता नियम 51 चे पालन न करणे, व्यक्ती/संस्था/ठेकेदार यांचे नावे निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी न करता देयके अदा करणे, एकाच ठेकेदारास बीड कॅपेसिटी न तपासता अनेक कामे देणे, कॉक्रीट रस्त्यांचे काम काजात अनियमितता, मोजमाप पुस्तिकामध्ये ऑथोरिटी व्यवस्थित न लिहीणे,

काँक्रीटीकरणावर डांबरीकरण करणे, रस्त्यांच्या व भूमीगत गटारांच्या कामांचे तुकडे पाडणे, मंजुर असलेली कामे ग्रामपंचायत हद्दीच्या बाहेर करणे, साहित्याची खरेदी करताना जीईएम पोर्टलचा वापर न करणे, कामांची काही कामे होटगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये करणे, सन-2023-2024 मधील तांत्रीक मान्यता देण्यात आलेल्या कामांच्या संख्येपेक्षा ग्रामपंचातीकडील झालेल्या कामांची संख्याही ग्रामपंचायतीकडील प्रमाणकानुसार जास्त असणे, पदभार हस्तारीत न करणे, चौकशी समितीस दप्तर उपलब्ध न करून देणे, आर. ओ. प्लॉट एटीएम मधील रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा न करणे. हा आर्थिक अपहर सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या संगनमताने झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

एनटीपी प्रकल्पाने गाव जगाच्या नकाशावर; आता कोट्यवधींच्या अपहार उड्डाणांने फताटेवाडी चर्चेत एनटीपी प्रकल्पाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी हे गाव जगाच्या नकाशावर आले. या प्रकल्पाने या दूर्लक्षित गावाला ओळखी दिली. त्यानंतर आता येथे उघड झालेल्या तब्बल 4 कोटी 42 लाखांच्या अपहार प्रकरणारने फताटेवाडी हे गाव चर्चेत येणार आहे.

सरपंचासह तिघांचे कोटीत अपहार करण्याचे मोठं धाडस फताटेवाडरचे सरपंच हरिशचंद्र राठोड, उपसरपंच आर. व्ही. जाधव व ग्रामसेवक बी. डी. पाटील यांनी 4 कोटी 42 लाख 91 हजार रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे. एवढ्या मोठ्या सार्वजनिक हिताच्या रक्कमेवर डल्ला मारण्याचे मोठे धाडस सरपंच हरिशचंद्र राठोड, उपसरपंच आर. व्ही. जाधव व ग्रामसेवक बी. डी. पाटील यांनी केल्याचे दाखल गुन्ह्यावरुन स्पष्ट झाले आहे.

अलिकडच्या काळातील सर्वात मोठा अपहार सोलापूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये अपहार केल्याची काही प्रकरणे अलिकडे चौकशीअंती पुढे आली आहेत. मात्र तब्बल साधारण साडेचार कोटी रुपयांचा अपहार उघड होण्याचे अलिकडच्या काळातील फताटेवाडी ग्रामपंचायतीमधील अपहाराचे हे सर्वात मोठे प्रकरण समजले जात आहे.

You Might Also Like

सांगोला तालुक्यातील आरोग्याचे प्रलंबित प्रश्न सोडवा : दीपक साळुंखे

नोटरी करून एकाच जागेची अनेकांना विक्री

सोलापूर – चंदनउटी पुजेतून मंदिर समितीला 35 लाखांचे उत्पन्न

सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात

राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याने राज्याला नवीन 5 आमदार मिळाले आहेत
Next Article एकनाथभाऊंची किक वर्मी बसली हाऊसमध्ये ठाकरेंची लाज काढली

Latest News

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 14, 2025
नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर
देश - विदेश June 14, 2025
सांगोला तालुक्यातील आरोग्याचे प्रलंबित प्रश्न सोडवा : दीपक साळुंखे
सोलापूर June 14, 2025
नोटरी करून एकाच जागेची अनेकांना विक्री
सोलापूर June 14, 2025
वारकर्‍यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा समजून काम करावे : प्रकाश आबिटकर
महाराष्ट्र June 14, 2025
सोलापूर – चंदनउटी पुजेतून मंदिर समितीला 35 लाखांचे उत्पन्न
सोलापूर June 14, 2025
आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप : प्रणती नायकने  पटकावले कांस्यपदक
देश - विदेश June 14, 2025
आयएसएसएफ विश्वचषक २०२५ : सुरुची सिंगने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये जिंकले सुवर्णपदक
महाराष्ट्र June 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?