मुंबई, 24 जून (हिं.स.) :
लंडनहून
मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील काही प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची
प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सर्वांना
वैद्यकीय कक्षात नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली.
एअर
इंडियाचे विमान १३० हे लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून मुंबईला येत होते.
उड्डाणादरम्यान पाच प्रवाशांची आणि दोन क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली. सर्वांना
अचानक चक्कर येऊ लागली आणि मळमळल्यासारखे वाटू लागले.
विमान
मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.जिथे वैद्यकीय पथक आधीच तयार होते.
उतरल्यानंतरही दोन प्रवाशांची आणि दोन क्रू मेंबर्सची प्रकृती सुधारली नाही.
त्यामुळे त्यांना वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात
आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनीही घटनेची संपूर्ण माहिती दिली. आता या घटनेची
चौकशी करण्यात येणार आहे.