Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

admin
Last updated: 2025/06/17 at 6:32 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 17 जून, (हिं.स.)। जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. भीमा, सीना नदीकाठासह उपसा सिंचन योजनेवरील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. यंदा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उजनी धरणातील पाणीपातळी 50 टक्के झाली आहे.

उजनी धरणात काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास 90.30 टीएमसी इतका एकूण पाणीसाठा तर 26.64 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी 49.72 इतकी आहे. यंदा मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यापासूनच उजनी धरण परिसरात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने धरण 50 टक्के भरले. दौंडमधून उजनीत 11 हजार 719 क्यूसेकने पाणी येत असल्याने उजनी धरण भरण्यास मदत होत आहे.

येत्या पंधरा दिवसांत आणखी जोरदार हजेरी लावल्यास उजनी यंदा जून महिन्यातच शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी 16 जूनला उजनी धरण वजा पातळीत होते. त्यावेळी धरणात वजा 26.25 टीएमसी पाणीसाठा होता. यंदा 16 जूनला पाणी पातळी 26.6 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी 16 जूनला एकूण पाणीसाठा हा 37.43 टीएमसी इतका तर यंदा तो 90.30 टीएमसी इतका आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?
Next Article राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?