अमरावती, 10 जुलै, (हिं.स.) पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणी आकोला या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे. यंदा सहा महिन्यात म्हणजेच जूनअखेर ५२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात १७८ आत्महत्या आहे. दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अनेक कारणांमुळे पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे. यावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन गंभीर नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत.अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधित तब्बल ५२७ शेतकरी आत्महत्या झाल्या
सन २००१ पासून शेतकरी आत्महत्या
अमरावती जिल्हा : ५,४७७यवतमाळ जिल्हा : ६,३५१अकोला जिल्हा : ३,२०७वाशिम जिल्हा : २,१०७बुलढाणा जिल्हा : ४,५३२
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात
जानेवारी ते जून पर्यंत झालेल्या आत्महत्या आकडेवारी
अमरावती जिल्हा -101यवतमाळ जिल्हा -178अकोला जिल्हा -90बुलढाणा जिल्हा -91वाशिम जिल्हा -67