सोलापूर — सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील त्या प्राथमिक शिक्षकाच्यां २२०२०१७३ या शिर्षका खाली शिल्लक असलेले ६२ कोटी रकमेतून ३.५ कोटी रक्कम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त शिक्षकाच्यां उपदानातून संगणक वसूली रक्कम वर्ग करावेत अशी मागणी सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्या कडे मागणी केली असल्याचे माहीती अध्यक्ष सुभाष फुलारी यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
सेवानिवृत्त शिक्षकाच्यां उपदानातून संगणक प्रशिक्षण मुदतीत पूर्ण केले नाही म्हणून दिलेली वेतनवाढ वसूल करून घेतली होती या विरोधात महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने अध्यक्ष शिवानंद भरले यांनी मुबंई उच्च न्यायालयात २६१ सेवानिवृत्त शिक्षकाच्यां ५ याचिका दाखल केले होते त्याचा निर्णय सेवानिवृत्त शिक्षकाच्यां बाजूने लागून ९० दिवसाच्या आत रकमा परत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
त्या प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सुध्दा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनाही बजावलेत सध्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक वेतनाच्या २२०२०१७३ या शिर्षका खाली ६२ कोटी रक्कम शिल्लक आहेत त्या रकमा सेवानिवृत्त शिक्षकाच्यां उपदानातून संगणक वसूली रक्कम परत करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकाच्यां २२०२०१७३०४ या शिर्षका खाली वर्ग करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक प्राथमिक पुणे मा शरद गोसावी यांच्या कडे केली आहे. जिल्ह्यातील ३६२ सेवानिवृत्त शिक्षकाच्यां ६ याचिका अजून सुनावणीला बाकी आहेत म्हणून शिक्षक शिल्लक वेतनातून वर्ग करावेत असे मागणी केली आहे या वेळी रमेश गायकवाड, काळप्पा सूतार, मल्लिकार्जुन बडदाळ, बसवणप्पा जिरगे बादशहा मुल्ला, आ दी उपस्थित होते.