Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

admin
Last updated: 2025/05/29 at 5:55 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 29 मे (हिं.स.)।

कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत असताना रक्तदाब, मधुमेह व अन्य आजार असलेल्या कोमॉर्बिड रुग्णांनी सावध राहण्याची गरज आहे. कोरोनाचे रुग्ण सात्तत्याने आढळत आहेत. अनेक वेळा रुग्णांची संख्या तुरळक असते तेव्हा त्यास स्पोरॅडीक स्थिती मानली जाते. कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याचे अहवाल समोर येऊ लागले आहेत.

सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातही याबाबत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील खासगी दवाखान्यांना कोरोना रुग्णांबाबत दैनंदिन माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अश्विनी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुस आजारांबाबत दाखल होणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी केली जाते. इतर आजारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये सात वयोवृद्ध रुग्ण हे कोरोनाबाधित असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. पण, याशिवाय शहरात कुठेही कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. या पध्दतीचे तुरळक संसर्ग वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या ताप व सर्दीसमवेत आढळत असतात. पण आता कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगाने होईल का अशी आशंका समोर येऊ लागली आहे.

देशातील विविध शहरात कोरोना रुग्णांची संख्या समोर येऊ लागली आहे. या स्थितीत कोरोनाचा संसर्ग झाला तरी सर्वाधिक नुकसान कोमॉर्बिड लोकांचे होते. कारण या व्यक्तींना पूर्वीचे रक्तदाब, मधुमेहासारखे आजार असतात. या आजाराचे प्रमाण वाढले असेल व त्यात कोरोना झाला तर गुंतागुंत होऊ शकते.

मागील कोरोना लाटेत देखील कोमॉर्बिड व्यक्तीचे सर्वाधिक नुकसान झाले. या स्थितीत पुन्हा कोरोनाच्चा संसर्ग वाढल्यास कोमॉबिंड लोकांची काळजी घ्यावी लागणार आहे.

You Might Also Like

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागार पदावरून एलन मस्क यांची एक्झिट
Next Article सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?