नवी दिल्ली, 14 जून (हिं.स.) : देशात गेल्या 2 दिवसांपासून कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावात काहीशी घट दिसून आली आहे. देशभरात शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोरोनाचे 7400 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 269 नवीन रुग्ण आढळले. मृतांचा आकडा 87 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे शुक्रवारी राजस्थान आणि केरळमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये 70 वर्षीय महिलेचा आणि केरळमध्ये 82 वर्षीय इसमाचा श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे मृत्यू झाला. या वर्षी राजस्थानमध्ये कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे, तर जानेवारीपासून केरळमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सध्या देशात सर्वाधिक 2109९ कोविड रुग्ण आहेत. तथापि, गुरुवारपर्यंत 2165 सक्रिय रुग्ण होते.
————————
