Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एअर इंडियाची 8 उड्डाणे रद्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

एअर इंडियाची 8 उड्डाणे रद्द

admin
Last updated: 2025/06/20 at 5:17 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 20 जून (हिं.स.) : विमान तपासणीत वाढ, खराब हवामान आणि हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे एअर इंडियाने आज, शुक्रवारी अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. प्रभावित झालेल्या उड्डाणांमध्ये दुबई, चेन्नई, दिल्ली, मेलबर्न, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबई दरम्यानच्या उड्डाणांचा समावेश आहे.

एअर इंडियाच्या निवेदनानुसार, दुबई ते चेन्नई पर्यंत एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय उड्डाणे एआय-906; दिल्ली ते मेलबर्न एआय-308 ; मेलबर्न ते दिल्ली एआय-309; दुबई ते हैदराबाद एआय-2204 आणि पुणे ते दिल्ली पर्यंतची देशांतर्गत उड्डाणे एआय-1874; अहमदाबाद ते दिल्ली एआय 456; हैदराबाद ते मुंबई एआय-2872 आणि चेन्नई ते मुंबई एआय 571 ही देखभाल आणि ऑपरेशनल कारणांमुळे रद्द करण्यात आली आहेत.एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि त्यांच्या सोयीसाठी अनेक पावले उचलली आहेत. एअरलाइनने 21 जून ते 15 जुलै पर्यंत त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे कमी करण्याची आणि तीन मार्गांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, प्रवाशांना पूर्ण परतफेड किंवा मोफत रीशेड्युलिंगची सुविधा दिली जात आहे.

एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला वाईट वाटते. आमचे ग्राउंड स्टाफ सहकारी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकरात लवकर पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहेत. प्रवाशांना पूर्ण परतफेड किंवा रद्द केल्यास मोफत रीशेड्युलिंगची ऑफर देण्यात आली आहे. एअरलाइनने प्रवाशांना वेबसाइटवर त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचे किंवा ग्राहक सेवा क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. आमच्या विमानावरील वाढत्या तपासणीमुळे, हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे आणि खराब हवामानामुळे काही व्यत्यय येऊ शकतात. प्रवाशांना याबद्दल वेळेवर माहिती दिली जाईल. प्रवाशांनी कृपया http://airindia.com/in/en/manage/flight-status.html येथे त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासा किंवा 011 69329333, 011 69329999 वर आमच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा किंवा आमच्या वेबसाइट http://airindia.com ला भेट द्या असे आवाहन एअरलाईन्सने केलेय.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत – अजित पवार
Next Article स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?