राज्यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर झाली. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. तब्बल २० हजार ५७ वाहने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक खरेदी करण्यात आली.
चारचाकी प्रकारात यंदा २२ हजार ८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून, ही मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८ पर्णांक ८४ इतकी आहे. दुचाकी वाहन प्रकारात २०२५ मध्ये ५१ हजार ७५६ नवीन वाहनांची खरेदी झाली. मागील वर्षी हीच खरेदी ४० हजार ६७५ एवढी होती. राज्यात सर्वात जास्त पहिल्या पाच परिवहन कार्यालय अंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यात पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक मुंबई (मध्य) आणि ठाणे या परिवहन कार्यालय अंतर्गत सर्वात जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली