सोलापूर : मोची समाजाचे आराध्य दैवत श्री आदी जांबमुनी महाराज यांचा रथोत्सव २२ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो; परंतु सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने शासनाचे नियम व अटी पाळून रथोत्सवाची मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी दिली.
मिरवणूक रद्द केल्यामुळे यंदा उत्सव कालावधीत सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, व्याख्यान, प्रसाद वाटप, अन्नधान्य वाटप, समाजातील ज्येष्ठांचा सन्मान आदी कार्यक्रम होणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या उपक्रमात एकता ग्रुप मोदी, जांबमुनी प्रतिष्ठान, एमआयडीसी, सुनीलनगर आदी संस्था, संघटनांचा सहभाग असणार आहे. याशिवाय या वर्षात राज्यस्तरीय मोची, मादीगा, मादरू समाजाचा भव्य मेळावा घेण्याचे नियोजन असल्याचेही भंडारे यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष राजू नीलगंटी, बसवराज, म्हेत्रे, प्रा. नरसिंह आसादे, हणमंतू सायबोळू, योगेश पल्लेलू, दत्तात्रय जामकर, उमेश नीलगंटी, वेदमूर्ती म्हेत्रे आदी उपस्थित होते.