कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागलं आहे. पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यामध्ये आज रविवारी पहाटे एका भिंतीवर चक्क नागरिकांना धमकी देणारी एक सूचना लिहिण्यात आली आहे.
भाजपाला मत देणाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. “तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं गेलं तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपाला एकही मत दिलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील” असा धमकी देणारा मेसेज भिंतीवर लिहिण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बंगाली भाषेत हे लिहिण्यात आलं आहे. हा मेसेज नेमका कोणी लिहिला असेल यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच राजकारण तापलं आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली असल्याने केंद्र विरोधात राज्य सरकारमध्ये दरी वाढू लागली आहे. आजी माजी खासदारांसह 11 आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शहांच्या उपस्थितीच भाजपात प्रवेश केला आहे. वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता नाराजांनी अधिकाऱ्यांसोबत भाजपात प्रवेश केला आहे. याच दरम्यान नागरिकांना धमकी देणारी एक सूचना समोर आली आहे.