बार्शी : आरक्षण चुकल्यामुळे बार्शी तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायतीची निवडणूक आयोगाने रद्द केली. याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. आरक्षण चुकण्यास कारणीभूत झालेल्यांवर याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. बालाजी ताटे या ग्रामपंचायत सदस्याने याबाबत ॲड. विकास जाधव यांच्याकरवी आयोगाकडे तक्रार केली होती.
पानगाव ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांच्या 15 जागा आहेत. त्यापैकी 5 जागा सर्वसाधारण पुरुष व 5 सर्वसाधारण महिला आणि 4 नागरिकांचा इतर मागासवर्ग व 1 अनुसूचित जातीसाठी राखीव होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरक्षण नियमानुसार एकूण 5 प्रभागांपैकी प्रत्येक प्रभागात 1 सर्वसाधारण पुरुष व 1 सर्वसाधारण महिलेसाठी पद ठेवून इतर आरक्षण पदे प्रत्येक प्रभागात 1 या प्रमाणे चक्राकार पध्दतीने देेणे अपेक्षित होते. मात्र प्रभाग क्र. 2 मध्ये आरक्षणाचे एकही पद ठेवण्यात आले नाही व प्रभाग 5 मध्ये सर्वसाधारण वर्गासाठी एकही पद ठेवण्यात आले नाही.
ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकार्यांकडे धाव घेण्यात आली मात्र त्यांनी आरक्षण बदलण्यास नकार दिल्यामुळे आयोगापर्यंत प्रकरण नेण्यात आले. तेथे झालेले आरक्षण सदोष असल्याचे मान्य करुन निवडणूक रद्द करण्यात आली.