सोलापूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांनी पंढरपुरात सर्व सोयी सुविधायुक्त सुसज्ज असे क्रीडा संकुल निर्माण करू असा शब्द मतदारांना दिला होता. त्यांनी दिलेल्या या शब्दाची दखल घेत पुत्र तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी चांगलाच पुढाकार घेतला आहे.
पंढरपूर शहरात क्रीडा प्रेमीसांठी बॅडमिंटन हॉल, हॉकी, कुस्ती मॅट, ट्रक आदी अनेक खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी शासकीय सुसज्ज क्रीडासंकुल उभारण्यात येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या कामात भगीरथ भालके यांनी पुढाकार घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भगिरथ भालके यांनी मुंबई येथे क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भेट घेत पंढरपुरात क्रीडा संकुल उभारणीबाबत सहकार्य करण्याबाबत चर्चा केली. मुंबई येथे त्यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भेट घेत पंढरपुरात क्रीडा संकुल उभारणीबाबत सहकार्य करण्याबाबत चर्चा केली असता क्रीडामंत्री सुनील केदार यांनी तात्काळ पंढरपूर क्रीडा संकुलचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशा सूचना सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दूरध्वनीवरून दिले आहेत.
सोलापूर जिल्हा किल्ला अधिकाऱ्यांना सूचना देत पंढरपुरातील क्रीडा संकुलाचा प्रस्ताव त्वरित सादर करावा असे सांगितले. तसेच, या क्रीडा संकुलाला दिवंगत आमदार भारत भालके यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासनदेखील केदार यांनी चर्चेदरम्यान दिले.
भगीरथ भालके यांनी मतदार संघातील विविध प्रश्नांसाठी मुंबई येथे जयंत पाटील व इतर मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या शासकीय निवासस्थानी जात त्यांना भेटून मतदारसंघातील क्रीडा संकुल याबाबत माहिती देत दिवंगत आमदार भारत भालके यांचे क्रीडा संकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मतदारसंघातील क्रीडाप्रेमींना न्याय देण्याची भूमिका घेत मदत करावी, अशी विनंती केली.