सांगली : जिल्ह्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. तरीही रुग्णसंख्या 1108 वर पोहोचली असली, तरी आज प्रत्यक्ष उपचाराखाली 628 रुग्ण आहेत. आणि आज अखेर बरे झालेले रुग्ण संख्या 439 इतकी आहे. जिल्ह्यात आज अखेर 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण पॉझिटिव्ह पैकी 23 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येचे अपयश हे प्रशासनाने की नागरिकांच्या दुर्लक्षितपणाचे याबाबत सुजाण नागरिकात खल चालू आहे.
आज नवीन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ग्रामीण भागात 8 शहरी भागात 7 तर महापालिका क्षेत्रात 19 आढळून आले आहेत. तसेच ग्रामीण भागात 636 पॉझिटिव, शहरी भागात आज अखेर 91, मनपा क्षेत्रात आज अखेर 381रुग्ण.
आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण, कडेगाव 2, शिरढोण 1,विटा 1,समडोळी 1, शिराळा 2,तुरची 1,जरंडी 1,इस्लामपूर 1, कामेरी 3, सांगली 14 ,मिरज 5, कवठेमहांकाळ 1, या भागात आढळून आले आहेत.
मृत्यू पावलेले रुग्ण, अष्टविनायक चौक मिरज येथील 70 वर्षांची महिला, विजयनगर सांगली येथील 45 वर्षांचा पुरुष, आंबेडकर नगर सांगली येथील 77 वर्षांचा पुरुष, बुरुड गल्ली सांगली येथील 73 वर्षाचा पुरुष असे आहेत,अतिदक्षता विभागात ऑक्सिजन’वर 11 रुग्ण असून व्हेंटिलेटरवर 12 रुग्ण आहेत.
* तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी 82 ,जत107, कडेगाव 53, कवठेमहांकाळ 31, खानापूर 36, मिरज 75,पलूस 67, शिराळा 159, तासगाव 30,वाळवा 87, मनपा 381, अशी आहे. रुग्ण संख्येत मनपा, शिराळा, वाळवा, आटपाडी, असा अग्रक्रम आहे.