Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकरी आंदोलन : दिल्ली सीमेवरच अंत्यसंस्कार करा, सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

शेतकरी आंदोलन : दिल्ली सीमेवरच अंत्यसंस्कार करा, सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

Surajya Digital
Last updated: 2021/01/02 at 3:39 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर 38 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी असून सुद्धा शेतकऱ्यांनी माघार घेतली नसून कृषी कायदे मागे घेण्याची मागणी कायम ठेवली आहे. त्यातच दिल्ली सीमेवर आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

गाजियाबादच्या यूपी गेटवर शौचालयामध्ये आज शनिवारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंह (वय 75) होते.दिल्ली सीमेवरच अंत्यसंस्कार करा, आसे सूसाईड नोट लिहित शेतकऱ्याने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने नुकतेच तीन नवे कृषी विषयक कायदे लागू केले आहेत. हे तीनही कायदे शेतकरीविरोधी असल्याचे म्हणत, सरकारने ते तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीला घेऊन गेल्या 38 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. हे आंदोलन सुरू असतानाच शनिवारी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. या शेतकऱ्याने दिल्ली सीमेवरील गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन स्थळी तयार करण्यात आलेल्या एका शौचालयात फाशी घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आत्महत्याग्रस्त शेतकरी काश्मीर सिंग यांची सुसाईड नोट आढळून आली आहे. यात त्यांनी लिहिले आहे, की त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. तसेच आपल्यावर दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सीमेवरच अंत्यसंस्कार करण्यात यावेत.

* हृदयविकाराच्या झटक्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू 

तत्पूर्वी गाझीपूर सीमेवर शुक्रवारी एका शेतकऱ्याची हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मोहन सिंग (57) असे या शेतकऱ्याचे नाव होते. ते बागपत जिल्ह्यातील गवानपूरमधील नांगल गावचे रहिवासी होते. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

* सोमवारी चर्चेची पुढची फेरी

आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघटनांनी दिल्ली-हरयाणाला जोडणाऱ्या सिंघू सीमेवर बैठक घेतली. शेतकरी आणि सरकारमध्ये सोमवारी ( ता. 4 ) चर्चेची पुढची फेरी होणार आहे. बुधवारी 30 डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. त्यात सरकारने वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करणे आणि दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक तरतुदी मागे घेण्याचे आश्वासन शेतकरी संघटनांना दिले. परंतु तिन्ही कृषी कायदे मागे घेणे आणि किमान हमी भावाला कायदेशीर संरक्षण देणे या मुद्द्यांवर कोणताही तोडगा निघू शकला नाही.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #शेतकरीआंदोलन #दिल्ली #सीमेवरच #अंत्यसंस्कारकरा #सूसाईड #नोटमध्ये #शेवटचीइच्छा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोना लस मोफत मिळणार नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोफत लसीच्या घोषणेवरुन घुमजाव
Next Article मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवीला टेरर फंडींगप्रकरणी अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?