Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेसला ‘रामराम’ केल्यानंतर उर्मिलांनी ‘सीएम रिलिफ फंड’ला दिले काँग्रेस निवडणुकीचे २० लाख
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थराजकारण

काँग्रेसला ‘रामराम’ केल्यानंतर उर्मिलांनी ‘सीएम रिलिफ फंड’ला दिले काँग्रेस निवडणुकीचे २० लाख

Surajya Digital
Last updated: 2021/01/05 at 9:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : काँग्रेसच्या निवडणूक निधी खात्यातून २० लाख रुपये शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधी अर्थात सीएम रिलीफ फंडाला दिल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ५० लाखांचा निधी उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून देण्यात आला होता. त्यांनी त्यातील २० लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून दिले. आता या पैशावरून चर्चा सुरू झाली असून, ऊर्मिला मातोंडकर यांनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उर्मिला मातोंडकर यांनी वर्षभरापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर उर्मिला यांनी गेल्याच महिन्यात शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, उर्मिला यांना काँग्रेसने २०१९ लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून भाजपचे गोपाल शेट्टी यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती.

उर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक खर्चासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे कांदिवलीतील सार्वजनिक बँकेत संयुक्त खाते उघडले होते. या संयुक्त खात्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव अशोक सुत्राळे हे खातेधारक होते. प्रत्येक उमेदवाराला खर्चाचे निवडणूक आयोगाने बंधन घातलेले असून, ७० लाखांपर्यंत उमेदवाराला खर्च करण्याची मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे एप्रिल २०१९ मध्ये ऊर्मिला यांच्या निवडणूक प्रचारासाठी सुरू केलेल्या संयुक्त खात्यात महाराष्ट्र काँग्रेसने ५० लाख रुपये जमा केले होते.

* काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने दिले

निवडणुकीसाठी या खात्यातून ३० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. तर जुलै  २०२० पर्यंत खात्यात २० लाख रुपये शिल्लक होते. या खात्यातील २० लाख रुपये ऊर्मिला मातोंडकर यांनी जुलैमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून दिले. ही मदत काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर देण्यात आल्यामुळे आता याची चर्चा सुरू झाली.

स्वतः ऊर्मिला मातोंडकर यांनी याबद्दल भूमिका मांडली आहे. काही कुख्यात लोक सीएम रिलीफ फंडला दिलेल्या मदतीवरून कथा रचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या परवानगीनेच लॉकडाउनच्या काळात हे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आले. या पैशाचा वापर कोरोनाच्या काळात लोकांच्या कल्याणासाठीच मी केल्याचे ऊर्मिला यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत – अजित पवार

TAGGED: #काँग्रेसला #रामराम #केल्यानंतर #उर्मिलांनी #सीएमरिलिफफंड #दिले #काँग्रेस #निवडणुकीचे #२०लाख
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधानांकडून वेळ मिळत नसल्याची संभाजीराजेंची खंत
Next Article चार जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?