मुंबई : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. राज्यात कोरोनाची वाढती संख्या आणि नवीन कोरोनाची भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले होतं. दरम्यान मुंबईत आजपासून रात्रीची संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय योग्य असला तरीही या निर्णयामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झाल्याचे आता बोलले जात आहे.
मुंबई पोलिसांनी रात्री संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईमध्ये 23 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत रात्रीची संचारबंदी राहणार होती. या संचारबंदीमध्ये वाढ करावी अथवा करू नये यासाठी मुंबई महापालिकेमध्ये एक महत्वपूर्ण बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडली होती. या बैठकीत रात्र संचारबंदी ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. परंतु ही घोषणा मुंबई पोलिसांच्या वतीने केली जाणार होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कालपर्यंत ही रात्र संचारबंदी होती आणि आजपासून ती उठवण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे.
22 डिसेंबर 2020 पासून 5 जानेवारी 2021 पर्यंत पालिका आणि मुंबई पोलिसांनी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे
त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये प्रशासनाकडून शिथिलता आणण्यात आली आणि नागरिकही मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले. अशातच काही दिवसांतच 2021 हे नवं वर्ष सुरू होत असल्याने 31 डिसेंबर रोजी लोकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडू नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता.