Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यातील मंडईच्या शारदा गजानन मंदिरात चोरी, चोरीची ही दुसरी घटना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

पुण्यातील मंडईच्या शारदा गजानन मंदिरात चोरी, चोरीची ही दुसरी घटना

Surajya Digital
Last updated: 2021/01/08 at 1:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडई येथील शारदा गजानन हे गणपती मंदिर पुणेकरांच्या श्रद्धेचं स्थान आहे. पण याच मंदिरात चोरी झाली आहे. बाप्पांच्या मुर्तीवरील जवळपास 22 ते 25 तोळे सोने व काही रोख रक्कम चोरीला गेली आहे. चोरीची घटना शुक्रवारी पहाटे निदर्शनास आली. दरम्यान, याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच याच मंदिरातील चोरीची ही दुसरी घटना आहे.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीसोबतच महात्मा फुले मंडई येथील शारदा गजानन बाप्पा देखील पुणेकरांच्या मनातील श्रद्धास्थान आहे. पण याच मंदिरात बाप्पांचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महात्मा फुले मंडई येथे असणाऱ्या शारदा गजानन हे मंडळ पुण्यातील प्रसिद्ध मंडळांमध्ये गणले जाते. या मंदिरातीलचोरीची ही दुसरी घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वेळी बाप्पांच्या मूर्तीवरील जवळपास 22 ते 25 तोळे सोने व काही रोख रक्कम लंपास केली आहे. चोरीची घटना शुक्रवारी पहाटे निदर्शनास आली. चोरीच्या घटनेची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

* चोरीची ही दुसरी घटना

या अगोदर तीन वर्षांपूर्वी मंदिरातील दानपेटी चोरीला गेली होती. त्यानंतर मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवतानाच सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्यात आली होती. मात्र तरीदेखील चोरट्यांनी मध्यरात्री डाव साधत बाप्पांच्या दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला. या चोरीच्या घटनेनंतर मात्र एकच खळबळ उडाली आहे. दरवर्षी गणेश उत्सवातील देखावे व मिरवणूक आकर्षण व चर्चेचा विषय ठरत असते.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #पुण्यातील #मंडईच्या #शारदा #गजानन #मंदिरात #चोरी #चोरीचीही #दुसरीघटना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यांनी सहकार्य केले तर पेट्रोल 5 रुपयांनी होऊ शकेल स्वस्त
Next Article चंद्रकांत पाटील यांचा लोकसभा निवडणुकीबाबत खळबळजनक दावा

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?