Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भंडारा जिल्हा रूग्णालयातील धक्कादायक माहिती, यामुळेच गेला १० नवजात बालकांचा बळी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

भंडारा जिल्हा रूग्णालयातील धक्कादायक माहिती, यामुळेच गेला १० नवजात बालकांचा बळी

Surajya Digital
Last updated: 2021/01/09 at 4:45 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयातील एक धक्कादायक माहिती समोर आलीय. आरटीआय कार्यकर्ते विकास देवेंद्र मदनकरांनी 2018 रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयातील फायर सेफ्टीविषयी माहिती मागवली होती. त्यावेळी प्रशासनाने उत्तरात येथे ‘फायर सेफ्टी हायड्रन्ट्स, फायर सेफ्टी स्प्रिंकलर्स सिस्टम, स्मोक अलार्म नाही’ असं म्हटलं होतं. जुलै 2020 रोजीही पुन्हा याची विचारणा केली असता ‘परिस्थिती जैसे थे’ असल्याचं समोर आलं होतं.

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आलीय.

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. तर आरोग्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे. या दुर्घटना प्रकरणात मोठी आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माहिती अधिकारात असे समोर आले आहे की, २०१८ पासून रुग्णालयात कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणाच उपलब्ध नव्हती. भंडाऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विकास देवेंद्र मदनकर यांनी २०१८ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर सेफ्टीविषयी म्हणजेच आग नियंत्रण यंत्रणेबाबतची माहिती मागवली होती. त्यावेळी प्रशासनाने त्यांना दिलेल्या उत्तरात आग नियंत्रण यंत्रणा उपलब्धच नसल्याचं म्हटलं होतं.

२४ अॉक्टोबर २०१८ रोजी दिलेल्या या उत्तरात प्रशासनाने म्हटलं होतं, फायर सेफ्टी हायड्रन्ट्स रुग्णालयात उपलब्ध नाही, फायर सेफ्टी स्प्रिंकलर्स सिस्टम रुग्णालयात उपलब्ध नाही, स्मोक अलार्म रुग्णालयात उपलब्ध नाही, तर फायर Extinguisher काही उपलब्ध आहेत तर काही उपलब्ध नाहीत.

Fire Hydrant – उपलब्ध नाही

Fire Sprinklers – उपलब्ध नाही

Smoke Alarm – उपलब्ध नाही

Fire Extinguisher – कधी भरले होते याची माहिती उपलब्ध नाही

Fire Escape Ladder, Fire Escape Routes: उपलब्ध नाही

धक्कादायक म्हणजे, ही माहिती प्रशासनाने २०१८ रोजी दिली होती आणि त्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते विकास देवेंद्र मदनकर यांनी जुलै २०२० रोजी पुन्हा याबाबत विचारणा केली असता परिस्थिती जैसे थे असल्याचं समोर आलं. Fire Safety करिता अंदाजपत्रक व आराखडे प्रशासकीय मान्यता व निधी करिता वरिष्ठांना सादर केलेले आहे अशी माहिती त्यांना देण्यात आली.

* आम्ही प्रयत्न केले पण वाचवू शकलो नाही

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या घटनेने देश हादरला आहे. मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 10 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. त्यांचे वय 1 ते 3 महिन्यादरम्यान आहे. घटना घडली त्यावेळी नर्स ड्यूटीवर होती. धूर निघताना पाहून त्यांनी तत्काळ माहिती दिली, आम्ही खूप प्रयत्न केले आणि 7 बालकांना वाचवले, मात्र 10 चिमुकल्यांना वाचवू शकलो नाही, अशी माहिती येथील डॉक्टर प्रमोद खंडाते यांनी दिली.

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #भंडारा #जिल्हारूग्णालयातील #धक्कादायक #माहिती #यामुळेचगेला #१०नवजात #बालकांचा #बळी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता
Next Article सोलापूरला अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी 250 कोटींचा निधी प्राप्त

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?