Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीतील औषध विक्रेत्यांना पोलिसांनी बजाविल्या नोटिसा; कोरोनासदृश रुग्णांची माहिती देणे बंधनकारक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

बार्शीतील औषध विक्रेत्यांना पोलिसांनी बजाविल्या नोटिसा; कोरोनासदृश रुग्णांची माहिती देणे बंधनकारक

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 5:31 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

बार्शी : बार्शी तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील सर्व औषध विक्रेते व खासगी डॉक्टर यांना पोलिसांनी नोटिसा बजाविल्या आहेत. याव्दारे कोरोनासदृश्य लक्षणे असणार्‍या रुग्णांची माहिती प्रशासनास कळविण्याचे बंधन घातले आहे. याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मध्यंतरी बार्शीतील लॉकडाऊनची पाहणी केल्यानंतर दिलेल्या आदेशानुुसार सीआरपीसी व बीपी अधिनियमातील तरतुदीनुसार या नोटीसा बजाविण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली आहे.

शहरातील काही औषध विक्रेते, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय परस्पर औषध विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. डॉक्टरांच्या परस्पर ऐकिव माहितीवरुन स्वत:वर औषध उपचार करुन प्रकृती अत्यंत बिघडल्यानंतर काही रुग्ण दवाखान्यात धाव घेत असल्याचे आढळून आले आहे. शेवटच्या टप्प्यातील हे रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर दवाखान्यांचाही नाईलाज होत आहे. त्यामुळे प्रशासनालाही आता कठोर भूमिका घ्यावी लागत आहे

या नोटीसीनुसार, शहरातील डॉक्टरांनी कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्या रुग्णाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमाकांची माहिती अरोग्य विभागाला कळविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे औषध विक्रेत्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध विक्रीस मनाई करण्यात आली आहे. कोरोनासदृश्य लक्षणे असणार्‍यांना औषधे दिली गेली असल्यास या रुग्णांची नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकासह माहिती कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #मेडिकल #दुकान #नोटिसा #बंधनकारक #कोरोनासदृश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लाखोंच्या उपस्थित होणारी शिराळ्याची प्रसिद्ध ‘नागपंचमी’ उत्सव लॉकडाऊनमुळे स्थगित
Next Article कोरोनाच्या वैश्विक महामारीत ‘या’ पक्षाच्या खासदाराचे अजब विधान; क्रुरकर्माची अल्लाहने दिलेली शिक्षा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?