Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली लोक पिकनिक साजरी करतायत, बर्ड फ्लू पसरण्याची भीती’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

‘शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली लोक पिकनिक साजरी करतायत, बर्ड फ्लू पसरण्याची भीती’

Surajya Digital
Last updated: 2021/01/10 at 8:51 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जयपूर : राजस्थानच्या कोटामधील भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी एक व्हिडिओ शेअर करत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका केली आहे. सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी विकृत मानसिकतेचे असल्याचं ते म्हणाले. आंदोलनाच्या नावाखाली हे लोक पिकनिक साजरी करत आहेत. तसंच हे तथाकथित शेतकरी बिर्याणी खाऊन बर्ड फ्लू पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान,  शेतकऱ्यांना दहशतवादी आणि दरोडेखोर असे शब्द वापरणं लाजिरवाणी बाब आहे. ज्या अन्नदात्याने तुमच्यापर्यंत अन्न पोहोचवलं त्यांच्या आंदोलनाला तुम्ही पिकनिक म्हणता. बर्ड फ्लूसाठी त्यांना जबाबदार ठरवत आहात? त्यांचे हे वक्तव्य भाजपाची विचारसरणी दाखवत असल्याचे काँग्रेस नेत्यांकडून टीका होत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भाजप आमदार मदन दिलावर यांचा सुमारे दोन मिनिटांच्या व्हिडिओ आहे. ‘तथाकथित शेतकरी हे आंदोलन करत आहेत. आंदोलन कशासाठी आहेत? जे कायदे शेतकऱ्यांसाठी आणले गेलेत ते रद्द करण्यासाठी. शेतकऱ्यांना कुठलाही लाभ मिळू नये, हा त्याचा हेतू आहे. तथाकथित शेतकरी देशाची चिंता करत नाहीत, देशातील जनतेचीही चिंता नाही, त्यांच्यासाठी आंदोलन काय आहे … ते तर पिकनिकची मजा घेत आहेत,चिकन बिर्याणी खात आहेत, काजू बदाम खात आहेत. ते ऐश्वर्यात आहेत आणि वेष बदलून तिथे येत आहेत. त्यात दहशतवादीही असू शकतात. त्यात दरोडेखोरही असू शकतात. शेतकऱ्यांचे शत्रूही असू शकतात. या सर्वांना देश उद्ध्वस्त करायचा आहे’, असा आरोप भाजप आमदार दिलावर यांनी केला.

‘चिकन बिर्याणी खावून त्यांचा बर्ड फ्लूचा पसरवण्याचा कट आहे ,असं वाटतं. केंद्र सरकारने त्यांना दूर केलं नाही तर ते देशात मोठे आंदोलन घडवू शकतील अशी भीती वाटते. म्हणूनच आंदोलन करणाऱ्यांना एकजूट होण्यापासून रोखलं पाहिजे. रस्त्यावर बसून ते नागरिकांसमोर समस्या निर्माण करत आहेत, असं आमदार मदन दिलावर म्हणाले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #शेतकरीआंदोलनाच्या #नावाखाली #लोक #पिकनिक #साजरी #करतायत #बर्डफ्लू #पसरण्याची #भीती'
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवारांनी केला गृहमंत्र्यांना फोन, केली स्वतःच्या सुरक्षेत कपात करण्याची मागणी
Next Article नाशिक हादरले! 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?